प्रचितगड (Prachitgad)

प्रचितगड (Prachitgad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणारा प्रचितगड किल्ला कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता .

उंची : ३२०५ फूट ⛰
इतिहास 🚩

● (Prachitgad) हा किल्ला आदिलशाहीत होता.
● आदिलशहाने जखुराय सुर्वे यांच्याकडून १४०४ मध्ये हा (Prachitgad) किल्ला बांधून घेतला.
● इ. स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
● पुढे १८१८ मध्ये इतर गडांप्रमाणे इंग्रजांनी हा किल्लाही जिंकून घेतला.

पाहण्यासारखे 😍

◆ गडावर उध्वस्त असं प्रवेशद्वार आहे.
◆ गडावर भैरी भवानीच मंदिर आहे.
◆ मंदिरासमोर पाच तोफा ठेवलेल्या आहेत.
◆ गडावर ७ पाण्याची टाकी आहेत.
◆ गडावर पदक वाडा असून काही पडकी घरेही आहेत.
◆ गडाच्या पश्चिमेला टेहाळणीसाठी कातळात खोदलेला एक खड्डा आहे.

विशेष 🤩

संभाजी महाराजांच या गावात काही महिने वास्तव्य होतं . त्या वास्तव्यात त्यानी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता.

जवळचे किल्ले 🤩

  1. भवानीगड
  2. गुणवंतगड
  3. दातेगड
कसे जाल ? 🕺🏼

प्रचितगडला (Prachitgad) जाण्यासाठी शृंगारपूर गावी जावे. शृंगारपूर हे गडाच्या पायथ्याला असलेले गाव आहे. खाजगी वाहन असल्यास मुंबई गोवा महामार्गा वरील चिपळूण गाठावे. चिपळूणच्या पुढे आणि संगमेश्वप्रचित रच्या अलिकडे २ किमीवर कसबा संगमेश्वर आहे. (मुंबई पासून अंतर २९५ किमी) येथे महामार्ग सोडुन आत जाणाऱ्या रस्त्याने १६ किमीवर शृंगारपूर गाव आहे.

  • राहाण्याची सोय : गावातील काही घरात,शाळेत आणि मंदिरात राहायची सोय होते.
  • जेवणाची सोय : गावातील काही घरात जेवणाची सोय होते.
  • पाण्याची सोय : गडावरील टाक्यात मार्च महिन्यापर्यंत पाणी असते.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search