गोवा किल्ला (Goa fort)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे गोवा किल्ला(Goa fort). हर्णेच्या किनार्यावर सुवर्णगडाचे रक्षण करण्यासाठी जी दुर्गत्रयी बांधली आहे त्यापैकी एक गोवा किल्ला, इतर दोन किल्ले कनकदूर्ग व फत्तेगड यांच्यापेक्षा हा किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे. तसेच सदयस्थितीत बर्यापैकी चांगल्या अवस्थेत उभा आहे.
उंची : ० फूट
इतिहास 🚩
● फत्तेगडाप्रमाणे या (Goa fort) किल्ल्याची बांधणीही शिवकाळानंतरचीच असावी असे मानतात.
● कान्होजी आंग्रे – मानाजी आंग्रे यांनंतर सुवर्णगड ,गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड या किल्ल्यांचा ताबा तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला.
● पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर , पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द मोहीम उघडली. त्यावेळी कमांडर जेम्स याने हे किल्ले जिंकून पेशव्यांच्या हवाली केले.
● इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांनी हे किल्ले पेशव्यांकडून जिंकून घेतले.
● १८६२ मध्ये किल्ल्यावर ६९ तोफा व १९ शिपाइ असल्याचा उल्लेख आढळतो.
स्थळदर्शन 😍
◆ (Goa fort)किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. यातील एक जमिनीच्या दिशेने व दुसरा समुद्राच्या दिशेने.
◆ किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूस असून तो दगडांनी बंद केलेला आहे.
◆ दरवाज्याच्या चौथर्याच्या तळाशी वाघाची आकृती आहे.
◆ दरवाजावर डाव्या बाजूला गंडभेरुड(म्हणजे द्विमुखी गरुड) व त्याने पायात पकडलेले चार हत्ती अशी शिल्पे आहेत.
◆ (Goa fort)किल्ल्याच्या दरवाजा समोरील तटावर मारुतीची मुर्ती आहे.
◆ किल्ल्यात एक साचपाण्याचे टाक आहे.
◆ किल्ल्याच्या दक्षिणभागात नैसर्गिक उंचवटा आहे, त्यावर किल्ल्याचा बालेकिल्ला आहे.
◆ तटाला असलेल्या पायर्यांनी तटावर चढून तटफेरी मारता येते. गडावर कलेक्टरच्या विश्रामधामाचे अवशेष आहेत.
जवळचे किल्ले 😍
- सुवर्णगड
- कनकदुर्ग
- फत्तेगड
कसे जाल ? 🚶🏼
मुंबईहून दापोली मार्गे मुरुड हर्णेला जाता येते. हर्णेच्या गावातून हर्णे बंदराकडे चालत जाताना उजव्या बाजूस, समुद्रकिनार्यावर गोवा किल्ला(Goa fort) आहे.
- राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
- जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
- पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.