रतनगड (Ratangad)

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात असलेला राकट किल्ला म्हणजे रतनगड (ratangad) किल्ला. हा किल्ला घनचक्कर पर्वत रांगेत असून , प्रवरा नदीचा उगमही इथेच आहे. घनदाट जंगल आणि भंडारदर्‍याचा विस्तीर्ण जलाशय असा हा निसर्गरम्य परिसर आहे या रतनगड (ratangad) किल्ल्याचा.

उंची : ४२५५ फूट ⛰️

इतिहास 🚩

● इ. स. १३६० साली हा किल्ला महादेव कोळी नायकांकडे होता.
● इ. स. १४०० साली बहमनी सल्तनत कडून जव्हारचे राजे नेमशहा यांच्या ताब्यात देण्यात आला.
● इ.स. १४९० मध्ये मलिक अहमद याने किल्ला जिंकला आणि पुन्हा नियुक्ती महादेव कोळी सरदारची केली.
● इ.स. १६३० मध्ये मोघल आक्रमण शहाजी राजे ,महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोघल विजयी आणि माहुलीच्या तहात किल्ला मोघलांना स्वाधीन केला.
● इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली.
● इ.स.१६८८ मध्ये मोघलांची दक्षिण स्वारी झाली, नाशिक आणि कल्याण मुघल सुभेदारांनी जव्हारच्या राजांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला.
● इ.स. १७२० मध्ये छत्रपती शाहूराजांनी किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात आणला.
● इ.स. १७५० साली पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला.प्रांताचे मुखयालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली.
● इ.स. १७५० ते १७९० मध्ये सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला.राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले.
● इ.स. १७९० मध्ये जावजी यांचे पुत्र हिरोजी हे सुभेदार झाले या काळात देवगाव चे देशमुख/नाईक वाळोजी भांगरे यांनी पेशवाईविरुद्ध बंड पुकारले आणि रतनगड घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
● इ.स. १८१३ मध्ये रामजी भांगरे हे राजूर चे सुभेदार झाले आणि रतनगड किल्ल्याचे किल्लेदार गोविंदराव खाडे झाले.
● ५ मे १८१८ रोजी तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात कॅप्टन गॉडर्ड याने किल्लेदार गोविंदराव खाडे यांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.

स्थळदर्शन 😍

◆ अमृतेश्वर मंदिर : गडाच्या खाली रतनवाडी गावात अमृतेश्वराचे मंदिर आहे. ज्यावर उत्कृष्ट प्रकारची कलाकृती केलेली आहे. या मंदिराची बांधणी सुमारे १२०० वर्षांपूर्वीची असून हे हेमाडपंथी बांधणीचे शिवमंदिर आहे.
◆ पुष्करणी : मंदिरानजीकच एक पुष्करणी आहे जिच्या चारही भिंतींवर देवांच्या प्रामुख्याने श्री विष्णूंच्या मूर्ती आहेत.
◆ पुष्कर्णीच्या बाजूलाच एका झाडाखाली काही वीरगळ आहेत.
◆ गणेश दरवाजा : रतनवाडी मार्गे चढल्यावर सर्वप्रथम हा डा दरवाजा लागतो. इथे चढताना आपल्याला लोखंडी जिन्यावरून चढून जावे लागते.
◆ रत्ना देवीची गुहा : गणेश दरवाजातून वर आल्यानंतर उजव्या बाजूला या गुहा आहेत,
◆ हनुमान दरवाजा : गणेश दरवाजातून वर आल्यानंतर डाव्या बाजूला वर चढलो की हा दरवाजा आहे.
◆ कडेलोट पॉइंट : हनुमान दरवाजातून वर आल्यानंतर डाव्या बाजूला हा बुरुज आहे, हा बुरुज नैसर्गिक असून त्यात आटल्याबाजूने खंदकाप्रमाणे एक खड्डा कोरलेला आहे.
◆ राणीचा हुडा, हनुमान दरवाजातून वर आल्यानंतर उजव्या बाजूला हा बुरुज आहे.
◆ अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तळे : राणीच्या हुडा बुरुजापासून डाव्या बाजूला दिसणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर या वास्तू पाहता येतात. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
◆ कल्याण दरवाजा : राणीच्या हुडा बुरुजापासून डाव्या बाजूला साधारणत: १०-१५ मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील हा दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे.
◆ नेढ़ : इथूनच पुढे गेल्यावर हे नेढं आहे, आणि गडावरील सर्वात उंच टेकडी हीच आहे. येथून अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा सर्व परिसर दिसतो.
◆ प्रवरेचे उगमस्थान, नेढ्याच्या दुसऱ्या वाटेने पुढे उतरून गेल्यावर हा उगम पाहता येतो.
◆ त्रिम्बक दरवाजा : (यालाच साम्रद दरवाजा असेही म्हणतात) या दरवाज्यातून पायऱ्यांनी खाली उतरून गेल्यावर आपण साम्रद गावाकडे जाण्याऱ्या वाटेवर येतो.
◆ इमारतींचे जोते : (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)

राणीच्या हुडा
राणीचा हुडा

रतनगडावरील नेढं
रतनगडावरील नेढं

विशेष 🤩

रतनगड (ratangad) हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहावा डोंगर आहे.

कसे जाल ? 🏃🏻‍♂️

१) रतनगड (ratangad) व खुट्टा सुळका यांच्या मधून – ही वाट रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून म्हणजेच साम्रद गावातुन जाते. या वाटेने गडावर जातांना ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी २ तास लागतात. ही वाट सोपी आहे.
२) शिडीची वाट – ही वाट गडाच्या डावीकडून म्हणजेच रतनवाडी गावातून जाते. गडावर जाण्यास साधारण २ तास पुरतात, वाट तशी सोपी आहे.

  • राहाण्याची सोय : शिडीच्या वाटेने वर चढल्यावर पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस तीन गुहा आहेत. यात ७० ते ७५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : गडावर बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

2 Comments

  • Laxmi Prabhu
    4 years ago Reply

    Mast,👌👌👍🤩

  • Mayur mahabal
    4 years ago Reply

    Chaan mahiti 🙏

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search