दातेगड (Dategad)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असलेला दातेगड (Dategad) किल्ला हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याजवळ आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत. दातेगड जिंकून घेतल्यावर छ. शिवाजी महाराजांनी त्याचे नाव सुंदरगड ठेवले होते.
उंची : ३४२५ फूट
इतिहास 🚩
● पंधराव्या शतकात दातेगड (Dategad) किल्ला शिर्केंच्या ताब्यात होता.
● मलिक उत्तुजारने शिर्केंचा पराभव करुन हा गड बहामनी सत्तेत सामील करून घेतला.
● बहामनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर हा गड आदिलशाहीत गेला.
● १५७२ मध्ये पाटणकरांना या गडाची देशमुखी मिळाली होती.
● अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा (Dategad) गड जिंकून घेतला.
● १६८९ साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा गड मुघलांनी जिंकून घेतला.
● परंतु परत आक्रमण करून मराठ्यांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
● यानंतर १८१८ मध्ये इंग्रजांनी लढाई न करताच हा गड जिंकून घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ दातेगड (Dategad) किल्ल्याला चारीही बाजुंनी काळ्या कातळाची तटबंदी लाभलेली आहे.
◆ गडावर प्रवेश करताना डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत त्यात पाहारेकर्यांना विश्रांतीसाठी एक खोली आहे.
◆ पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत.
◆ वाड्यात एक छोटी विहीर आहे.
◆ वाडा पाहून पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्या दिसतात.
◆ पायर्या उतरल्यावर समोर कातळ भिंतीत कोरलेली ६ फ़ूट उंच गणपतीची मुर्ती आहे.
◆ तर त्याच्या काटकोनात असलेल्या कातळ भिंतीवर मारुतीची ८ फुटी मुर्ती कोरलेली आहे.
◆ मारुतीच्या मुर्ती समोर गडाचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार आहे.
◆ प्रवेशव्दारातून किल्ल्या बाहेर पडल्यावर टोळेवाडीतून येणारा पायर्यांचा मार्ग दिसतो.
◆ गड माथ्यावर थोडे पुढे चालत गेल्यावर स्थापत्य शास्त्रातील एक अदभूत नमुना असलेली तलवारीच्या आकाराची विहीर पाहायला मिळते.
◆ ही विहीर ५० मीटर लांब X ३ मीटर रुंद आणि ३० मीटर खोल आहे. विहीरीत उतरण्यासाठी ४० ते ४५ मोठ्या पायर्या आहेत. यातील काही पायऱ्या तुटलेल्या आहेत.
◆ पाण्याच्या थोड्या वरच्या बाजूला पायर्यांलगत ६ फ़ूट उंच ६ फ़ूट रुंद एक गुहा आहे. गुहेत पिंड आणि गुहे बाहेर नंदी आहे.
◆ विहिर पाहून गडमाथ्यावर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात.
विशेष 🤩
🔸 दातेगडावरील तलवारीच्या आकाराची विहीर प्रसिद्ध आहे. दातेगडावरुन गुणवंतगड दिसतो.
कसे जाल ? 🕺🏼
दातेगड (Dategad) हा किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण शहराच्या जवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. पाटण – टोळेवाडी – दातेगड असा रस्ता आहे.
- राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय पाटण मध्ये आहे.
- जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय पाटण मध्ये आहे.
- पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.
सज्जनगड (Sajjangad) - trekkers ig
3 years ago[…] दातेगड […]
प्रचितगड (Prachitgad) - trekkers ig
3 years ago[…] दातेगड […]