वसईचा किल्ला (Vasai Fort)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर मध्ये असणारा एक उत्कृष्ट किल्ला म्हणजे वसईचा किल्ला(vasai fort).
मुंबईलगत साष्टी बेट होतं. ठाण्याचा प्रदेश होता. या बेटाचा मध्यवर्ती भाग हा टेकडय़ांनी व्यापला होता. या टेकडय़ांमधून वाहणाऱ्या लहानमोठय़ा नद्यांमुळे, तिथे असलेल्या दलदलीमुळे मुंबई हे बेट साष्टी बेटापासून वेगळं झालं. असं असलं तरी मुंबई आणि आजूबाजूच्या ठाणे परिसरात व्यापार करण्यासाठी मध्यवर्ती व्यापारी बंदर म्हणून वसईचा किल्ला बांधण्यात आला. उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबईच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले गेले त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला(Vasai Fort). वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टी हा सर्व परिसर, समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे.
उंची : ० फूट ⛰️
इतिहास 🚩
● १४१४ मध्ये भडारी भेंगाळे नावाच्या सरदाराने हा (Vasai Fort) किल्ला बांधला.
● १५३० मध्ये गुजराताच्या सुलतानाने हा किल्ला त्याच्याकडून जिंकून घेतला.
● पुढे १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी याचे महत्त्व जाणून पुर्नबांधणीसाठी घेतला.
● १७३७ साली मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ गेला.
● त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहिम चिमाजी आप्पांच्या हातात सोपवली.इ.स. १७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी मोहिम आखली. चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजुने हल्ला करायचे ठरवले. मराठ्यांनी लढून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य ’हर हर महादेव’ गर्जना करत आत घुसले. दुर्देवाने सुरुंग उशिरा उडाले, त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली. तुंबळ हातघाईची लढाई झाली.
● २ मे १७३९ रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली. लढाईत पोर्तुगिजांची ८०० माणसे मारली गेली. दारुगोळा संपला आणि पोर्तुगिज शरण आले. मराठ्यांनी किल्ला सर केला.
● १२ डिसेंबर १८७० रोजी (Vasai Fort) किल्ला इग्रजांच्या ताब्यात गेला.
पाहण्यासारखे 😍
◆ गावापासून (Vasai Fort) किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात उजवीकडे प्रवेशद्वार आहे त्यातून आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायर्य़ा आहेत.
◆ तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे.
◆ किल्ल्याला दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे.
◆ येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज.
◆ येथून पुढे आपण बालेकिल्ल्याकडे जाता येते.
◆ बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत तीन चर्च लागतात.
◆ बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे न्यायालयाची इमारत दिसते आणि पलिकडे एक हॉस्पिटल आहे.
◆ बालेकिल्ल्यात दारु कोठार, सैनिकांची वसतिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत. एका दगडावर कोरलेला शिलालेख सुध्दा आहे बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहिर आहे.
◆ प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला महादेवाचे व वज्रेश्वरीचे मंदिर आहे.
◆ तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे. त्याच्या पुढे कारागृह आहे.
◆ पुढे चिमाजी आप्पांचे विजय मिळवल्याबद्दलचे प्रतीक उभारलेले आहे.
जवळचे किल्ले 🤩
- डोंगरी किल्ला
- नायगावचा किल्ला
- वज्रगड
- घोडबंदरचा किल्ला
कसे जाल ? 🚶🏻
(Vasai Fort) किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील वसई गाठावे. स्टेशनपासुन किल्ला ६ किमीवर आहे . वसई स्टेशन ते किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बसेस,रिक्षा उपलब्ध आहेत.
- राहाण्याची सोय : (Vasai Fort) किल्ल्यात राहण्याची सोय नाही, वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत
- जेवणाची सोय : वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत.
- पाण्याची सोय : किल्ल्यात पाण्याची सोय आहे.
धारावी किल्ला (Dharavi Fort) - trekkers ig
3 years ago[…] वसईचा किल्ला […]