खांदेरी (Khanderi)

खांदेरी (Khanderi) हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. अलिबागच्या जवळ असणाऱ्या किल्ल्यांमधील हा एक महत्वाचा किल्ला आहे. अलिबागच्या थळ गावापासून जवळ समुद्रात असणारी खांदेरी-उंदेरी अशी ही दुर्गांची जोडगोळी. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणार्‍या खांदेरी – उंदेरीचे वैशिष्टय म्हणजे मजबूत तटबंदी, उंदेरीवर असणार्‍या १५-१६ तोफा, तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणार्‍या गाड्यासहीत असणार्‍या ३ तोफा होय.

उंची : ० ⛰️
इतिहास 🚩

● १६७९-१६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला.
● १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे आला.
● १८६७ मध्ये इंग्रजांनी किल्ल्यावर काही बांधकामे करून घेतली.

स्थळदर्शन 😍

◆ किनाऱ्यालगत असलेला खुबलढा अथवा थळचा किल्ला.
◆ किल्ल्यावर उंच टेकडी आहे त्यावर दीपस्तंभ आहे.
◆ किल्ल्यावर एकूण बारा तोफा आहेत.
◆ किल्ल्यावर वेताळेश्वराचे मंदिर आहे.
◆ किल्ल्यावर एकूण सोळा बुरुज आहेत.
◆ किल्ल्यावर तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत.
◆ किल्ल्याला असलेल्या तटबंदीत खोल्या सुद्धा बनवलेल्या आहेत.

दीपगृह

लोखंडी गाडा असलेली तोफ

विशेष 🤩

★ ३५० वर्षे लोटली तरी दोन दगडांमध्ये कोणतीही सामग्री न वापरता उभारलेली तटबंदी अजून जशीच्या तशी असलेली दिसते.
★ या (Khanderi) किल्ल्यावर एक शिळा आहे ज्यावर दगडाने मारल्यावर घंटेसारखा आवाज येतो.

घंटेसारखा आवाज येणारा दगड

जवळचे किल्ले 😍

  1. उंदेरी
  2. थळचा किल्ला ( खुबलढा किल्ला )
  3. कोलाबा
  4. सर्जेकोट
  5. हिराकोट
  6. रेवदंडा
  7. कोर्लई
  8. सागरगड

कसे जाल ? 🕺🏼

मुंबईहून अलिबागला गेल्यावर तिथून थळ साठी गाडी करावी. थळच्या किनाऱ्याला खुबलढा किल्ला आहे जो भग्नावस्तेत आहे तिथून जलमार्गाने आपल्याला खांदेरीला (Khanderi) जाता येते.

  • राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : खांदेरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे. उंदेरीवर पाणी अजिबात नाही.

1 Comment

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search