सज्जनगड (Sajjangad)
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात परळीचा किल्ला म्हणजेच सज्जनगड (Sajjangad) किल्ला आहे. प्रतापगडपासून सहयाद्री पर्वताची एक उपरांग पूर्वेकडे जाणाऱ्या रांगेला शंभूमहादेव या नावाने ओळखतात. याच रांगेवर हा सज्जनगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गाव असल्याने किल्ल्याला परळीचा किल्लाही म्हणतात.
उंची : ३३५० फूट
इतिहास 🚩
● प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ’आश्वालायनगड’ असेही म्हणत.
● या किल्ल्याचे बांधकाम शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केले.
● ४था बहमनी राजा महंमदशहा (१३५८ – १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो.
● पुढे हा किल्ला आदिलशाहीत गेला.
● इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान हा या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आहे.
● १ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला.
● शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर समर्थ रामदास येथे वास्तव्यास आले.
● पुढे या किल्ल्याचे नामकरण सज्जनगड (Sajjangad) असे करण्यात आले.
● पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला.
● ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ’नौरसतारा’ म्हणून नामकरण झाले.
● पुढे १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला.
● १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
पाहण्यासारखे 😍
◆ गडावर जाताना सर्वप्रथम जे द्वार आहे, त्या द्वाराला “छत्रपती शिवाजी महाराज द्वार” असे नाव देण्यात आले आहे.
◆ दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ’समर्थद्वार’ असेही म्हणतात.
◆ दुसर्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख दिसून येतो.
◆ गडावर जाणाऱ्या पायऱ्या संपायच्या आधी एक झाड लागते व तिथून उजवीकडे एक वाट जाते तिथेच ५ मिनिट अंतरावर एक रामघळ नावाची जागा आहे. जी समर्थ रामदासांची एकांतात बसायची जागा होती .
◆ गडावर पोहचले कि डावीकडे एक घोडाळे तळे आहे.
◆ घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे.
◆ समोरच आंग्लाई देवीचे मंदिरही आहे.
◆ तळ्याकडे परत येताना वाटेत श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा आहे.
◆ पुढे सोनाळे तळे आपल्याला दिसते.
◆ गडावर पेठेतल्या मारुतीचं मंदिर, धाब्याच्या मारुतीचे मंदिर, श्रीरामाचे मंदिर आणि ‘ब्रम्हपिसा’ मंदिर अशी मंदिरे आहेत.
◆ शिवाय गडावर श्रीधर कुटी नावाचा आश्रम, समर्थांचा मठ आणि शेजघर आहे.
विशेष 🤩
अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे
‘‘सहयाद्रीगिरीचा विभाग विलसे,मांदार श्रुंगापरी।
नामे सज्जन जो नृपे वसविला,श्री उर्वशीचे तिरी।
साकेताधिपती कपी भगवती,हे देव ज्याचे शिरी।
येथे जागृत रामदास विलसे,जो या जना उद्धरी।।’’
जवळचे किल्ले 🤩
- अजिंक्यतारा
- दातेगड
- वसंतगड
- वर्धनगड
कसे जाल ? 🕺🏼
सातारा शहरापासून १० किमी अंतरावर परळी गाव आहे, गावातून गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.
- राहाण्याची सोय : गडावर (Sajjangad) राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात, गडावर धर्मशाळा देखील आहेत, सज्जनगड ( सेवा मंडळाच्या ) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.
- जेवणाची सोय : गडावर (Sajjangad) जेवण्याची सोय होते.
- पाण्याची सोय : गडावर (Sajjangad) बारामही पिण्याचे पाणी आहे.
अजिंक्यतारा (Ajinkyatara) - trekkers ig
3 years ago[…] सज्जनगड […]