वैराटगड (Vairatgad)
काही गडकोट त्याच्या इतिहासापेक्षा त्याच्या आकाराने लक्ष वेधतात. भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या सातारा जिल्हय़ातील वैराटगड (Vairatgad) नावाचा कातळदुर्गही असाच एक गड आहे जो त्याच्या प्रचंड रूपाने आकर्षित करतो. वैराट गड हा वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून ८ किमी अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो.
उंची : ३३४० फूट
इतिहास 🚩
● शिलाहार राजा भोज याने ११७६ ते ११९३ या काळात किल्ल्याचे बांधकाम करून घेतले आहे.
● पुढे हा (Vairatgad) किल्ला यादवांच्या राज्यात होता.
● यादवांच्या पतनानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला.
● पुढे शिवरायांनी वाई प्रांत जिंकला त्यावेळी हा किल्लासुद्धा स्वराज्यात दाखल झाला.
● औरंगजेबाने इसवी सन १६९९ मध्ये हा (Vairatgad) गड जिंकून घेतला.
● पुढे हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.
● पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ किल्ल्याच्या गडमाथ्यावर काही पडक्या वास्तुंचे अवशेष आहेत.
◆ मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच पाच – सहा पाण्याची टाकी आहेत.
◆ मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढे अजून एक प्रवेशद्वार आहे.
◆ तिथेच जवळ एक छोटीशी गुहासुद्धा आहे.
◆ इथून २०-२५ पायऱ्या चढून आपण गडाच्या मुख्य प्रभागात येतो.
◆ गडावर एक मारुतीचं मंदिर आहे, मंदिरात आणि मंदिराबाहेर हनुमानाच्या मूर्ती आहेत.
◆ गडावर बऱ्याच प्रमाणात चौथरे येतात यातील एक सदरेच्या भाग आहे.
◆ गडदेवता वैराटेश्वराचे राऊळही गडावर आहे. जीर्णोद्धार झालेल्या या राऊळाची सभामंडप, गाभारा अशी रचना आहे.
◆ गाभाऱ्यातील महादेवाचे दर्शन घेत सभामंडपात आलो, की आपल्याला एक वीरगळ दिसून येते.
विशेष 🤩
गडावरून कृष्णा-वेण्णा नद्यांची खोरी, निळे-जांभळे डोंगर, त्यावरची ती पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, खंबाटकी, चंदन-वंदन, नांदगिरी, जरंडेश्वर, मेरूलिंग अशी विविध गिरिशिखरे आपल्याला दिसतात.
जवळचे किल्ले 🤩
- पांडवगड
- केंजळगड
- चंदन-वंदन
- कमळगड
कसे जाल ? 🕺🏼
वाई सातारा मार्गावर असलेल्या कडेगाव पूल येथे उतरून व्याजवाडी गावात जावे. या गावातून २ वाटा गडावर जातात.
- राहाण्याची सोय : गडावरील मारुती मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते.
- जेवणाची सोय : गडावर गगनगिरी महाराजांचे शिष्य राहतात. त्यांच्याकडे २ ते ४ जणांची जेवणाची सोय होते. जास्त लोक असतील तर जेवणाची सोय आपणच करावी.
- पाण्याची सोय : बारमाही पिण्याची सोय आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ५ ते ६ पिण्याच्या पाण्याच्या टाकी आहेत.
Google Map 🌎
वैराटगड (Vairatgad) 👈🏻 येथे क्लिक करा
चंदन-वंदन (Chandan-Vandan) - trekkers ig
4 years ago[…] वैराटगड […]
प्रतापगड (Pratapgad) - trekkers ig
4 years ago[…] वैराटगड […]