देवगिरी (Devgiri)
देवगिरी (Devgiri) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांची यादी काढली तर देवगिरी त्यात हमखास येतोच. हा देवगिरी पूर्वी “सुरगिरी” या नावाने देखिल ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची “देवगड व धारगिरी” अशी ही नावे आढळतात. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले.
उंची : 2975 फूट ⛰
इतिहास 🚩
● यादव वंशातील भिल्लम २ या राजकुमाराने बाराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरी (Devgiri) गावाची स्थापना केली व किल्ला बांधला.
● १२९४ मध्ये अल्लाऊद्दीन खिलजीने फसवणूक करून राजा रामदेवरायाकडून हा किल्ला जिंकून घेतला.
● १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा मुहम्मद या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले.
● तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यानंतर १३४७ साली बहामनी सत्तेची स्थापना झाली आणि हा किल्ला बहामनी सत्तेत आला.
● इ.स १५०० नंतर हा किल्ला निजामशाहीत गेला.
● पुढे तो मुघलांनी जिंकून घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ या किल्ल्याला एकूण चार कोट आहेत.
◆ ‘अंबरकोट’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे.
◆ या कोटाच्या आतील तटबंदी म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट म्हणजेच दुसरा कोट याला ‘महाकोट’ असे म्हणतात.
◆ यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘कालाकोट’.
◆ कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी.
◆ प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे.
◆ संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने एक खंदक आहे.
◆ हत्ती तलाव – एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे.
◆ भारतमाता मंदिर – या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने (‘नळदुर्गाच्या’ नऊ पाकळ्यांच्या बुरुजा सारखे) आहेत.
◆ चाँद मिनार – भारतमाता मंदिराच्या समोरच १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात.
◆ गडावर ‘चिनीमहाल’ या नावाचा वाडा आहे जो आता पडलेल्या अवस्तेत आहे.
◆ पुढे अजून एक ‘निजामशाही वाडा’ आहे. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते.
◆ या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत.
◆ किल्ल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात.
◆ २३ फुट लांब असलेली मेंढा तोफही आपल्याला येथे पाहायला मिळते.
◆ या किल्ल्यावर ‘काला पहाड’ , दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ अश्या मोठ्या तोफाही आहेत.
◆ या किल्ल्यावर पाहण्यासारखे अजून बरेच काही आहे किल्ला फिरायला एकूण ७ – ८ तास इतका वेळ लागतो.
जवळचे किल्ले 🤩
- लहुगड
- बीबी का मकबरा
विशेष 🤩
★ सभासद बखरीत याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी (Devgiri) हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’ असे केलेले आहे.
कसे जाल ? 🕺🏼
देवगिरीचा किल्ला औरंगाबाद – धुळे रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर आहे. या दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद-धुळे, औरंगाबाद – कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय औरंगाबादहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात.
- राहाण्याची सोय : किल्ल्यात राहण्याची सोय नाही. औरंगाबादला राहण्याची सोय होऊ शकते.
- जेवणाची सोय : किल्ल्याच्या समोर खाण्यासाठी हॉटेल्स आहेत.
- पाण्याची सोय : किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.