चाकणचा भुईकोट (Chakan fort)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात इतिहासाची साक्ष देत उभा असलेला चाकणचा भुईकोट (chakan fort) किल्ला म्हणजेच संग्रामदुर्ग किल्ला. प्राचीन काळात चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. याच कारणामुळे इथे किल्ला बांधण्यात आला आहे. प्राचीन काळापासून इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची अवस्था सध्या वाईट आहे. हा किल्ला ६५ एकर एवढ्या विस्तृत परिसरात पसरलेला होता, परंतु सध्या ५.५ एकर एवढाच राहिलेला आहे. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी केलेल्या पराक्रमामुळे या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
उंची : ० फूट ⛰️
इतिहास 🚩
● चाकणचा भुईकोट (chakan fort) किल्ल्याचा इतिहास इतिहास हा प्राचीन आहे.
● हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडे असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
● यादवांचा पाडाव करून अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला जिंकून घेतला.
● इ. स. १४५३ : अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले.
● शिवाजी राजांचे पणजोबांचे(बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौर्यांशी परगण्याची जहागिरी दिली होती.
● पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत होता.
● शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होते. त्यांनी राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्यांचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.
● २१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भूइकोटला वेढा घातला.
● त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता.
● वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले, बुरुजावरील मराठे मारले गेले.
● मोगली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.
● पुढे हा किल्ला १७१३ साली स्वराज्यात परत आला.
● १०५ वर्षानंतर म्हणजेच १८१८ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
स्थळदर्शन 😍
◆ चाकणचा भुईकोटाची (chakan fort) आता खूप पडझड झाली आहे.
◆ पुर्व पश्चिम असलेल्या या चाकणच्या किल्लात पूर्वेकडून आपण प्रवेश करतो.
◆ प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असेल हे कळून येते.
◆ किल्ल्याची तटबंदी उंच असून यात दगड आणि विटांचे एकत्रित बांधकाम दिसून येतं.
◆ प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे.
◆ प्रवेशव्दार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या आहेत.
◆ बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्प पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे.
◆ मंदिर आणि मशिद अलीकडच्या काळातील बांधणीची असावी.
◆ इथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहता येतो.
◆ तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसून येतात.
विशेष 🤩
फिरंगोजी नरसाळा यांनी तब्बल ५५ दिवस हा (chakan fort) किल्ला लढवत ठेवला होता.
कसे जाल ? 🚶🏻♂️
मुंबई – तळेगाव – चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.
- राहाण्याची सोय : राहाण्याची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेल मध्ये होते.
- जेवणाची सोय : जेवणाची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेल मध्ये होते.
- पाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याची सोय स्वत: करावी.
Ganesh
4 years agoNice