पट्टागड (Pattagad)
पट्टागड(Pattagad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ घाटाच्या पूर्वेकडे असलेल्या या रांगेला “कळसूबाई रांग” असे म्हणतात. याच रांगेत पट्टागड उर्फ विश्रामगड आहे.
उंची : ४५६२ फूट ⛰
इतिहास 🚩
● सर्वप्रथम हा(Pattagad) किल्ला बहामनी सत्तेत असल्याचा उल्लेख आहे.
● बहामनी सत्तेनंतर हा किल्ला निजामशाहीत गेला.
● इ.स. १६२७ मधे मुगलांनी हा किल्ला निजामाकडुन जिंकून घेतला.
● इ. स. १६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला.
● १६७२ मधे मोगलांनी हा किल्ला पुन्हा जिंकिन घेतला.
● इ.स.१६७५ म्धे मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टगड परत स्वराज्यात आणला.
● १६८८ साली मातबरखानाने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.
● इ.स १७६१ मधे माधवरावांनी पट्टागड मुगलांकडुन जिंकला.
● पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.
◆ या(Pattagad) गडावर दोन गुहा आहेत.
◆ गुहांच्या पुढे त्रिंबक प्रवेशव्दार आहे.
◆ एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे.
◆ टाक्यापासून पुढे गेल्यावर अष्टभुजा पट्टा देवीचे मंदिर लागते.
◆ (Pattagad)किल्ल्यावर एक अंबारखाना आहे.
◆ अंबरखान्याचा आत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे.
◆ गडावर औंढा किल्ल्याच्या दिशेला गेल्यावर पाण्याची दोन मोठी टाकी लागतात.
◆ पुढे एक गुहा आहे. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे.
◆ गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात.
◆ पुढे गेल्यावर अजुन एक गुहा पाहायला मिळते.
◆ पुढे पाण्याची १२ टाकी पाहायला मिळतात. त्यांना “बारा टाकी” म्हणून ओळखतात.
◆ पुढे गेल्यावर दिल्ली दरवाजा लागतो.
विशेष 🤩
★ पट्टा(Pattagad) किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी महीनाभर विश्रांती घेतल्यामुळे किल्ल्याचे दुसरे नाव “विश्रामगड” असे देखील आहे.
जवळचे किल्ले 😍
- औंढा किल्ला
- बितनगड
कसे जाल ? 🕺🏼
मुंबईहून नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर घोटी गाव येते. घोटी गावतून टाकेद गावी जावे. आणि तिथून पट्टावाडी या गावी गेले की आपण (Pattagad) गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचतो.
- राहाण्याची सोय : १) किल्ल्यावरील गुहे समोरील शेडमधे २५ जणांची राहण्याची सोय होते.
२) पट्टावाडीत सुद्धा राहण्याची सोय होते. - जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
- पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
Google Map 🌎
लोकेशन पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.