भैरवगड-सातारा (Bhairavgad-Satara)

सातारा जिल्ह्यातील कोयनानगर विभागात मोडणारा भैरवगड (Bhairavgad-Satara) हा किल्ला एक गिरिदुर्ग आहे. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य “टायगर रिझर्व” घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.

उंची : ३००० फूट ⛰️

इतिहास 🚩

● या गडाचा उल्लेख इतिहासात कुठेही नाही.
● या गडाच्या बांधणी वरून हा गड टेहळणीसाठी असावा असे दिसते.

स्थळदर्शन 😍

◆ गडावर एक प्रशस्त मंदिर आहे. या मंदिरात भैरी देवी, श्री तुळाई देवी, श्री वाघजाई देवी यांच्या मूर्ती आहेत.
◆ मंदिराच्या सभामंडपात १०० जण राहू शकतील इतका मोठा आहे.
◆ मंदिरा समोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो.
◆ मंदिराच्या उजव्या बाजूला एका खडकावर शिवरायांचा छोटा पुतळा बसवलेला आहे.

◆ भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने खाली उतरणार्‍या पायवाटेने जावे.
◆ गडाच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरुज दिसतो.
◆ येथेच वरच्या बाजूला कातळात कोरलेली मोठी चौकोनी गुहा आहे.
◆ येथून थोडे पुढे जाऊन डोंगराला वळसा मारल्यावर दरीच्या बाजूला बुरुज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दक्षिणाभिमुख दरवाजा आहे.

◆ या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे.
◆ या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन टाकी आहेत.
◆ मंदिराकडे येणार्‍या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे, येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे.
◆ मंदिराच्या मागच्या बाजूला कोकणातील गोवळ पाती गावात उतरणारी वाट आहे या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते.

सूचना 🧐

२०१२ साली भैरवगडाच्या(Bhairavgad-Satara) आजूबाजूचे अभयारण्य “टायगर रिझर्व” घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही. अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास रुपये ५०,०००/- दंड / ३ वर्षाची सजा होऊ शकते.

जवळचे किल्ले 😍

  1. सज्जनगड
  2. दातेगड
  3. अजिंक्यतारा

कसे जाल ? 🚶

भैरवगडावर(Bhairavgad-Satara) जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रमघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे.

१) दुर्गवाडी मार्गे: या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळून गाठावे. चिपळूण करून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणाऱ्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही.

२) हेळवाकची रामघळ मार्गे: हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण-कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतून वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आप्ण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाटा जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे.

३) गव्हारे मार्गे: गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचाव. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणाऱ्या वाटेस मिळते.

  • राहण्याची सोय : (Bhairavgad-Satara) गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.
  • जेवणाची सोय : (Bhairavgad-Satara) गडावर जेवणाची सोय नाही. ती आपण स्वतहः करावी.
  • पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

Google Map 🌎

लोकेशन पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search