पूर्णगड (Purnagad)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी तालुक्यात मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला एक छोटा आणि सुंदर किल्ला म्हणजे पूर्णगड (Purnagad). रत्नागिरी जिल्ह्यात खाड्यांमार्फत होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या हेतूने हा किल्ला बांधण्यात आला. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.
उंची : ३०० फूट ⛰️
इतिहास 🚩
● या किल्ल्याबद्दल जास्त इतिहास उपलब्ध नाही.
● काही लोकांच्या मते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटच्या काळात बांधून घेतला आहे.
● तर काही लोकांच्या मते हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी बांधून घेतला आहे.
● पुढे हा किल्ला पेशव्यांकडे होता.
स्थळदर्शन 😍
◆ या किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णगड (Purnagad) गाव आहे.
◆ पुर्णगड गावातून पायर्यांच्या मार्गाने १० मिनिटात आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारा जवळ येऊन पोहोचतो.
◆ या दरवाजाच्या आधी एक हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराच्या भिंती आधी पडल्या होत्या पण आता याचे काम झाले आहे.
◆ पुढे किल्ल्याचे गोमुखी प्रवेशद्वार आहे.
◆ प्रवेशद्वारावर श्री गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत.
◆ प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.
◆ समोरच एक मोठा चौथरा असून त्याच्या मागे किल्ल्याचा समुद्राच्या बाजूचा दरवाजा आहे.
◆ या दरवाज्याला दिंडी दरवाजा असेही म्हणतात.
◆ उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष असून डाव्या बाजूला एक समाधीचे तुळशी वृंदावन आहे.
◆ किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजूला असलेल्या जिन्याने फांजीवर चढून गड प्रदक्षिणेला सुरुवात करावी .
◆ एक एक बुरुज ओलांडत आपण समुद्राच्या बाजूला येतो.
◆ येथे तटबंदीचा काही भाग ढासळलेला होता, आता येथे काम चालू आहे जे लवकरच पूर्ण होईल.
◆ किल्ल्याची तटबंदी भक्कम असून पूर्ण गडाला प्रदक्षिणा मारता येते.
◆गडाच्या एका बाजूला मुचकुंदी नदी आणि एका बाजूला अरबी समुद्र आहे.
विशेष 🤩
★ रत्नागिरीहून एका दिवसात पूर्णगड (Purnagad), यशवंतगड (नाटे) आणि आंबोळगड हे किल्ले पाहाता येतात.
कसे जाल ? 🚶🏻♂️
रत्नागिरी ते पूर्णगड (Purnagad) अंतर २५ किलोमीटर आहे. एसटी बसने किंवा खाजगी वहानाने पूर्णगड गावात जाता येते. गावातून पाय्र्यांच्या वाटेने गडावर पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात.
- राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही.
- जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची व्यवस्था नाही.
- पाण्याची सोय : किल्ल्यावर पाणी नाही.
Vilas wahane
4 years agoUpdated New photos
विजयदुर्ग (Vijaydurg) - trekkers ig
4 years ago[…] पूर्णगड […]