रामशेज (Ramshej)

रामशेज (Ramshej) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील या किल्ल्याचा इतिहास जगप्रसिद्ध आहे.

उंची : ३२७० फूट

इतिहास 🚩

● वनवासात असताना श्रीरामांनी या किल्ल्यावर काही दिवस मुक्काम केला होता तेव्हा पासून या किल्ल्याला रामाची शय्या म्हणजेच रामशेज (Ramshej) असे म्हटले जाते असे म्हटले जाते.
● नाशिक जिल्हा मोगलांच्या ताब्यात असताना रामशेज मराठ्यांनी जिंकून घेतला.
● छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्खनेत आला. त्याने स्वराज्यातील किल्ले जिंकून घेण्याची सुरवात म्हणून रामशेज निवडला.
● २ फेब्रुवारी १६८२ या दिवशी शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याने ४० हजार सैन्य सोबत घेऊन रामशेजला वेढा घातला.
● यावेळी किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते.
● पुढे साडेपाच वर्षानंतर मुघलांनी हा किल्ला फितुरीने जिंकून घेतला.
● पुढे १७५२ मध्ये मराठ्यांनी पुन्हा रामशेज (Ramshej) जिंकून घेतला.
● पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

स्थळदर्शन 😍

◆ रामशेज (Ramshej) किल्ल्यावर जाताना २० मिनिट वर चढून गेल्यावर एक गुहा आहे, ज्यात रामाचे मंदिर आहे.
◆ गुहेच्या एका बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे.
◆ या गुहेच्या आधी थोडं वरच्या बाजूला बघितल्यास अजून एक गुहा दिसते.
◆ या गुहेत एक शंकराची पिंड आणि नंदीची मूर्ती आहे.
◆ या गडावर बरीच पाण्याची टाकी आहेत.
◆ गडाच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी दिसतील.
◆ गडावर एक मुख्य दरवाजा आहे आणि तो आज बुजलेल्या अवस्थेत आहे.
◆ मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला पायऱ्या उतरून गेल्यावर अजून एक दरवाजा आहे.
◆ हा दरवाजा दगडात कोरून बनवलेला आहे.

◆ पुढील रस्ता भग्नावस्तेत आहे.
◆ पायऱ्या चढून परत आल्यावर मुख्य दरवाज्याचे विरुद्ध दिशेला अजून एक दरवाजा आहे.
◆ या दरवाज्यातून उतरल्यानंतर आपण गुहेत येतो या गुहेला तटबंदी करून घेतलेली आहे.
◆ इथून वर येऊन बाल्लेकिल्ल्याकडे जाताना आपल्याला चुन्याचा घाना असलेले ठिकाण दिसते.
◆ इथून पुढे गेल्यावर एक देवीचं मंदिरही आहे.
◆ समोरच एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे.
◆ इथून डावीकडे थोडं खालच्या बाजूला गेल्यावर जलेल्या अवस्थेत एक गुप्त दरवाजा आहे.

◆ गडावर बऱ्याच पडक्या घरांचे अवशेष आहेत.

गडाच्या दरवाज्याशेजारी असलेल्या गुहेतील पिंड
बालेकिल्ल्याकडे जाताना एका खडकावर रेखाटलेली महाकालीचे चित्र

चुन्याचा घाण्याची जागा

विशेष 🤩

★ साडेपाच वर्ष मुघलांविरुद्ध लढलेल्या या (Ramshej) किल्ल्याचा इतिहास गर्वाने सांगण्यासारखा आहे.

★ अवघ्या ६०० मावळ्यानिशी हा किल्ला मुघलांविरोधात लढला आहे.

कसे जाल ? 🕺🏼

किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम नाशिक गाठावे. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’ कडे जाणारी एस टी पकडावी आणि आशेवाडी फाट्यावर उतरावे. येथून आशेवाडी गावात जावे. गावातून समोरच किल्ला दिसतो.

  • राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी मंदिर आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search