नळदुर्ग (Naldurg)
नळदुर्ग (Naldurg) हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. नळदुर्गाची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत.नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे.
ऊंची : 0 फूट
इतिहास 🚩
● स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात.
● हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता.
● पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला.
● बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला.
● पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग (Naldurg) जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली.
● इ.स. १७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता.
स्थळदर्शन 😍
◆ सध्याच्या नळदुर्ग (Naldurg) किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे.
◆ शंभरावर अधिक बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे.
◆ वैशिष्ट्यपूर्ण असलेला नऊ पाकळ्यांचा नवबुरुज.
◆ नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा.
◆ रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्या बंधार्यामध्ये जलमहाल आहे.
◆ हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्यामध्ये चार मजले आहेत
◆ किल्ल्यावर नर आणि मादी या नावाचे दोन धबधबे सुद्धा आहेत.
विशेष 🤩
★ नळदुर्ग (Naldurg) हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे.
कसे जाल ? 🕺🏼
पुणे – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग (Naldurg) गाव लागते.
- राहाण्याची सोय : किल्ल्यात राहण्याची सोय नाही. मात्र नळदुर्ग गावात राहण्यासाठी विश्रामगृहे आहेत.
- जेवणाची सोय : नळदुर्ग गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
- पाण्याची सोय : किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.