प्रतापगड (Pratapgad)

प्रतापगड (Pratapgad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक वनदुर्ग आहे. प्रतापगड हा जावळीच्या खोऱ्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. अफजलखान वधामुळे या किल्ल्याला खूप महत्व मिळाले.

उंची : ३५५६ फूट ⛰

इतिहास 🚩

●  १६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली.
●  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५८ मध्ये पार पडलेे.
●  इ.स.१६५६ ते इ.स १८१८ मध्ये काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रु पासुन अभेद्य राहिला.
●  हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाच्या युद्धासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. भेटीसाठी आलेल्या अफजलखानाने दगा केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला व सय्यद बंडा याने केलेल्या वाराला जीव महाला यांनी निष्फळ केले आणि त्याला मारले. यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरली.

pratapgad

स्थळदर्शन 😍

◆ प्रतापगड (Pratapgad) किल्ल्यावरील भव्य महादरवाजा.
◆ केदारेश्वर महादेवाचे मंदिर.
◆ बालेकिल्ला आणि प्रशस्त अशी सदर.
◆ गडाची ओळख म्हणता येईल असा चिलखती बांधणीचा बुरुज.
◆ नेपाळ मधून आणलेल्या शाळीग्राम शिळेपासून बनवण्यात आलेल्या भवानी मातेच्या सुंदर मूर्तीच मंदिर.

pratapgad

◆ किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे.
◆ त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत.
◆ विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे.
◆ १७ फुटाचा ब्रॉन्झ चा शिवाजी महाराज्यांचा पुतळा आहे, ज्याचे उदघाटन इ.स १९५७ साली पंडित. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

pratapgad

विशेष 🤩

★ इ.स १६६१ मध्ये महाराजांनी (Pratapgad) गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली.

pratapgad

जवळचे किल्ले 😍

  1. मकरंदगड
  2. कमळगड
  3. वैराटगड
  4. चंद्रगड
pratapgad

कसे जाल ? 🕺🏼

रस्त्याने
1) पुणे – महाबळेश्वर हे अंतर १२० किमी आहे.
महाबळेश्वर – प्रतापगड : 22 किमी आहे
2) मुंबई – पुणे – महाबळेश्वर हे अंतर २६० किमी आहे.
महाबळेश्वर – प्रतापगड : 22 किमी आहे
3) मुंबई – प्रतापगड ( मार्गे गोवा महामार्ग – पोलादपूर) २१८ किमी आहे.

रेल्वेने
सातारा हे महाबळेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन आहे. सातारा – महाबळेश्वर ५७ किमी आहे.

  • राहाण्याची सोय : गडावरील विश्रामगृहात रहाण्याची सोय होऊ शकते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणासाठी अनेक उपहारगृह आहेत.
  • पाण्याची सोय : बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

3 Comments

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search