सायनचा किल्ला (Sion Fort)

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे शहर मुंबई येथील एक महत्वाचा किल्ला म्हणजेच शीवचा किल्ला किंवा सायनचा किल्ला (Sion fort). महाराष्ट्राची राजधानी मुंबई रोजगार, व्यवसाय, आधुनिकता यासाठी प्रचलित आहे, परंतु एकेकाळी मुंबई हे बेटांचे शहर होते आणि त्यात बरेच किल्ले होते.

उंची : १९० फूट ⛰️

इतिहास 🚩

● माहीम खाडीच्या पूर्वेकडे इंग्रजांनी शीवचा किल्ला (Sion fort) बांधला.
● १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला बांधून घेतला.
● हा किल्ला अखेरपर्यंत इंग्रजांच्याच ताब्यात राहिला.

स्थळदर्शन 😍

◆ किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ २ तोफा पडलेल्या आहेत.
◆ किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे.
◆ जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे.
◆ किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत.

विशेष 🤩

🔸 ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.

जवळचे किल्ले 🤩

  1. रिवा किल्ला
  2. धारावी किल्ला
  3. माहिमचा किल्ला

कसे जाल ? 🕺🏼

मुंबईतील मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरल्यानंतर पूर्वेला चालत १० मिनिटांच्या अंतरावर हा (Sion fort) किल्ला आहे.

  • राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
  • पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.

Google Map 👇🌎

सायनचा किल्ला

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search