सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)
सुवर्णदुर्ग(Suvarnadurg) हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सुवर्णदुर्ग(Suvarnadurg) या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड.
उंची : ० फूट
इतिहास 🚩
● हा(Suvarnadurg) किल्ला शिलाहार राजांनी बांधल्याचे सांगितले जाते.
● छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये अली आदिलशहा कडून सुवर्णदुर्ग जिंकून घेतला.
● पुढे ह्या किल्ल्याचा कारभार कान्होजी आंग्रे यांनी केला.
● कान्होजी आंग्रे यांच्यानंतर त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा कारभार सांभाळला.
● पुढे त्यांचे सावत्र बंधू तुळाजी आंग्रे यांनी किल्ल्याचा कारभार बघितला.
● १७५५ मध्ये पेशव्यानी इंग्रजांशी हातमिळवणी करून हा किल्ला जिंकून घेतला.
● १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात आला.
पाहण्यासारखे 😍
◆ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधव घेतलेले प्रशस्त असं प्रवेशद्वार.
◆ प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात.
◆ या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.
◆ दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो.
◆ गडावर सात विहिरी आहेत.
विशेष 🤩
★ भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
जवळचे किल्ले 🤩
- कनकदुर्ग
- फत्तेदुर्ग
- फत्तेगड
कसे जाल ? 🕺🏼
मुंबई गोवा महामार्गावर असणार्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे.
हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.
बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत.
होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात.
ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.
- राहाण्याची सोय : (Suvarnadurg)गडावर राहण्याची सोय नाही, हर्णे गावात रहाण्याची सोय आहे.
- जेवणाची सोय : (Suvarnadurg) गडावर जेवणाची सोय नाही, हर्णे गावात जेवणाची सोय आहे.
- पाण्याची सोय : (Suvarnadurg) गडावर पाण्याची सोय नाही.