तोरणा ( Torna )
तोरणा (Torna) अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत.
उंची : ४६०३ फूट ⛰️
इतिहास 🚩
● इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला.
● पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला.
● शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून ‘प्रचंडगड‘ असे ठेवले.
● पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले.
● पुढे परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला.
स्थळदर्शन 😍
◆ तोरणा (Torna) गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
◆ प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या किल्ल्यावरील बुधलामाची आणि झुंझारमाची या माच्या पाहण्यासारख्या आहेत.
◆ तोरणा आणि राजगड हे किल्ले एकमेकांच्या बाजूला आहेत आणि ते एकाच पर्वतरांगेत असल्याने त्यांचा रस्ता ही पाहण्यासारखा आहे.
◆ गडावर तोरणजाई देवीचे मंदिरही आहे.
विशेष 🤩
★ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण हा किल्ला जिंकून बांधलं.
★ या किल्ल्याची डागडुजी करताना महाराजांना धन सापडले होते.
कसे जाल ? 🕺🏼
पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. ,पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गाने तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
- राहाण्याची सोय : गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
- जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
- पाण्याची सोय : मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.