तोरणा ( Torna )

तोरणा (Torna) अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत.

उंची : ४६०३ फूट ⛰️

इतिहास 🚩

● इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला.
● पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून ‘प्रचंडगड‘ असे ठेवले.
● पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले.
● पुढे परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला.

स्थळदर्शन 😍

◆ तोरणा (Torna) गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
◆ प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या किल्ल्यावरील बुधलामाची आणि झुंझारमाची या माच्या पाहण्यासारख्या आहेत.
◆ तोरणा आणि राजगड हे किल्ले एकमेकांच्या बाजूला आहेत आणि ते एकाच पर्वतरांगेत असल्याने त्यांचा रस्ता ही पाहण्यासारखा आहे.
◆ गडावर तोरणजाई देवीचे मंदिरही आहे.

Sanjivani machi

विशेष 🤩

★ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण हा किल्ला जिंकून बांधलं.
★ या किल्ल्याची डागडुजी करताना महाराजांना धन सापडले होते.

कसे जाल ? 🕺🏼

पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. ,पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गाने तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

  • राहाण्याची सोय : गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
  • जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
  • पाण्याची सोय : मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search