सुधागड (Sudhagad)

सुधागड (Sudhagad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. सुधागड (Sudhagad) अगदी पुणे आणि रायगडच्या सीमेलगत आहे. रायगड मधील तालुक्याचे नावही सुधागड – पाली तालुका असे आहे.

उंची : १९३५ फूट ⛰

इतिहास 🚩

● सुधागड (Sudhagad) हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत.
● हा गड १५२१ ते १५९४ या काळात निजामशाहीत होता.
● यानंतर या किल्ल्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते.
● इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला.
● या (Sudhagad) गडाचे आधीचे नाव भोरपगड होते.
● शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले.
● पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी हा गड सुद्धा काबीज केला.

स्थळदर्शन 😍

◆ किल्ल्यावर बघण्यासाठी बराच काही आहे.
◆ पंत सचिवांचा वाडा
◆ पश्चिमेकडील पठार
◆ महादरवाजा
◆ भोराई मंदिर
◆ शिवमंदिर
◆ विशाल कोठारे
◆ टकमक टोक अथवा बोलते कडे
◆ गोमुख असलेले टाके
◆ पाच्छापूर कडील बुरुज
◆ पूर्वेकडील बुरुज
◆ चोर वाट
◆ कातळात कोरलेली टाकी
◆ बांधीव टाकी

sudhagad
सुधागड वरून दिसणारा तैल-बैल

विशेष 🤩

★ सुधागड (Sudhagad) या किल्ल्याबाबतीत विशेष बाब म्हणजे या किल्ल्यावर महादरवाजा हा रायगडाप्रमाणेच आहे शिवाय येथे टकमक टोकाची आहे. म्हणून या किल्ल्याला प्रतिरायगड असेही म्हटले जाते.
★ स्वराज्याची राजधानी कोणती असावी या पर्यायांमध्ये सुधागडचाही विचार करण्यात आला होता असे सांगितले जाते.

जवळचे किल्ले 🤩

  1. सरसगड
  2. घनगड
  3. तैल-बैल

कसे जाल? 🕺🏼

सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे. तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळतीकडे निघावे. पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो. पुढे एक बावधान गाव आहे. तेथून पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.

  • जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वतः करावी. गडावर मोठी भांडी आहेत.
  • पाण्याची सोय : वाड्या पासून ५ मिनिटावर ३ मोठी टाकी आहेत. यापैकी सर्वात मोठ्या टाक्यात उतरण्यास सोय आहे.

3 Comments

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search