परंडा (Paranda)
महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा (Paranda) शहरात हा भुईकोट किल्ला आहे. हा प्राचीन किल्ला आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे.
उंची : ० फूट ⛰️
इतिहास 🚩
● या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सत्तेतील असावे असे इतिहासकारांचे मत आहे.
● बहामनी सत्तेच्या ऱ्हासानंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला.
● पुढे काही काळ या किल्ल्यावर मोगलांचे राज्य होते.
● १६२७ साली हा किल्ला शहाजीराजे भोसले यांच्या ताब्यात आला.
● १६३० मध्ये हा किल्ला आदिलशाहीत गेला.
● पुढे १६५७ मध्ये तो पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला.
● यानंतर हा किल्ला आलटून पालटून आदिलशाही व दिल्लीचे मोगल यांच्या ताब्यात राहिला.
स्थळदर्शन 😍
◆ (Paranda) किल्ल्याला सर्व बाजुंनी बांधीव खंदक आहे.
◆ भूईकोट किल्ला असल्याने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे.
◆ गडाचे पहिले उत्तराभिमुख प्रवेशव्दार खूप भव्य आहे.
◆ प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात.
◆ पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुसरेही एक प्रवेशद्वार आहे.
◆ पहिल्या व दुसर्या दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायर्या केलेल्या आहेत. वर चढून गेल्यावर दरवाजाच्या वरच्या बाजूस डाव्या बाजूला तटबंदीत वीरगळाचे अवशेष दिसतात.
◆ ते पाहून खाली उतरून पुढे उजवीकडच्या बाजूला किल्ल्याचा तिसरा पूर्वाभिमुख दरवाजा आहे.
◆ पुढे किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर आहे.
◆ या वाटेने जातांना आपल्या दोन्ही बाजूला ४० फुटांची तटबंदी लागते. बुरुजापासून वाट उजवीकडे वळते तिथे किल्ल्याचा चौथा भव्य महाकाय असा उत्तराभिमुख दरवाजा आहे.
◆ चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० ते ५० फुट असावी आणि बाजूला असणार्या बुरुजांची उंची तर जवळजवळ ६० फुट भरेल.
◆ दरवाजावर एक फ़ारसी शिलालेख आहे.
◆ चौथ्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उअजवीकडे पाचवा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे.
◆ त्यातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी मशिद आहे. खरे पाहाता ही मशीद म्हणजे पूर्वीचे माणकेश्वर मंदिर होते. आतमध्ये असणारे ३६ दगडी खांब, रचना या सर्व गोष्टी ते मंदिर असल्याची साक्ष देतात.
◆ पुढे एक पंचधातूची अप्रतिम तोफ़ आहे. या २० फुटी लांबीच्या तोफ़ेच नाव ‘मलिक ए मैदान’ असे आहे. तोफ़ेवर अरबी भाषेतील पाच लेख आहेत. त्यातील एक लेख तोफ़ेच्या तोंडावर कोरलेला आहे. तोफ़ेच्या मागच्या बाजूला पाकळ्यां सारका आकार दिलेला आहे. तोफ़ेवर दोन छोट्या सिंहाच्या मुर्ती आहेत.
◆ तोफ़ असलेल्या बुरुजाच्या बाजूला चौथ्या दरवाजाच्या वर असलेला नगारखाना आहे.
◆ पुढे एका बुरुजावर एक मोठी बांगडी तोफ आहे. तोफेच तोंड मगरीच्या आकाराचे आहे. या तोफेला दोन्ही बाजूला कड्या आहेत.
◆ परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे.
◆ त्याशेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत.
◆ किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे.
विशेष 🤩
हा (Paranda) किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.
जवळचे किल्ले 🤩
- कर्माळा किल्ला
कसे जाल? 🕺🏼
मुंबई – सोलापूर मार्गावरील कुर्डूवाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कुर्डूवाडीहून परांडा २२ किमीवर आहे. कुर्डुवाडी ते परांडा अशी बससेवा दर अर्ध्यातासाला आहे.
- राहाण्याची सोय : परांडा (Paranda) गावात राहाण्याची सोय आहे.
- जेवणाची सोय : परांडा (Paranda) गावात जेवणाची सोय आहे.
- पाण्याची सोय : (Paranda) किल्ल्यात पाणी नाही.