लोहगड (Lohagad)

लोहगड (Lohagad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड (Lohagad) आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते.

उंची : ३४०० फूट ⛰️

इतिहास 🚩

● लोहगड (Lohagad) किल्ला हा अती मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पु. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी
● सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
● १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
● इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला.

lohagad

● पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
● इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला.
● १७२०मध्ये आंग्र्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला.
● १७७०मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला.

lohagad

● नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.
● १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला.
● पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला.
● ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

स्थळदर्शन 😍

◆ गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.
गणेश दरवाजा
नारायण दरवाजा
हनुमान दरवाजा
महादरवाजा
◆ महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा आहे.
◆ दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.

lohagad fort

◆ लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. १०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे.
◆ विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.
◆ लोहगडाचा (Lohagad) उपदुर्ग असलेल्या विसापूरवर मोठी सपाटी आहे. तशीच मोठी दगडी तटबंदी आहे. प्राचीन शिलालेखही आहेत. डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत. ती इसवी सनापूर्वी कोरलेली आहे.

जवळचे किल्ले 😍

  1. विसापूर
  2. मोरगिरी
  3. तिकोना
  4. राजमाची
  5. घनगड
  6. तुंग
lohagad

कसे जाल? 🚶🏻

पुण्यावरून अथवा मुंबईवरूनलोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी.

  • राहाण्याची सोय : लक्ष्मी कोठी मध्ये रहाण्याची सोय होते. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
  • जेवणाची सोय : आपण स्वत: जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.
  • पाण्याची सोय : बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.

1 Comment

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search