गोवळकोट (Gowalkot)

चिपळूणपासून अगदी जवळ म्हणजे २ ते ३ कि.मी. अंतरावर एका सुंदर ठिकाणी (Gowalkot)गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा गिरिदुर्ग वशिष्ठी खाडीच्या तीरावर उभा आहे. चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती.

उंची : १५० फूट ⛰️

इतिहास 🚩

● इ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व (Gowalkot)गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली.
● संभाजी महाराजांच्या काळात गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला.
● २० मार्च १७३६ रोजी पिलाजी जाधव, चिमाजी अप्पा यांच्या नेत्वृत्वाखालील मराठी सैन्याची व सिद्दी सात याची लढाई झाली.

● यात सिद्दी सात मारला गेला. त्याचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी सिद्दी बरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला.
● १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला.
● पुढे १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ गडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे.
◆ या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.
◆ गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो.
◆ प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज शाबूत आहेत.

◆ यातील उजव्या बुरुजावरुन प्रवेशफेरी चालू केल्यास, प्रथम बुरुजावरील दोन तोफा दिसतात.
◆ तटावरुन पुढे जाताना डाव्या हाताला घरांचे चौथरे दिसतात, तर उजव्या बाजूस वाशिष्ठी नदी.
◆ तटावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचा प्रशस्त बांधिव तलाव दिसतो.
◆ तलावाच्या मागिल बाजूस एक १५ फूटी मातीचा उंचवटा आहे. त्यावरुन संपूर्ण किल्ला पाहाता येतो.

◆ गडाची तटबंदी ८ फूट रुंद असून शाबूत आहेत; पण गडाला असलेली दोनही प्रवेशद्वार नष्ट झालेली आहेत.
◆ गडावर रेडजाइ देवीच मंदिर आहे.
◆ गडाच्या उध्वस्त पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून पायर्‍यांनी खाली उतरुन गोवळकोट जेटीवर जाता येते. जेटीवर ५ तोफा उलट्या गाडलेल्या होत्या.
◆ २०१७ साली त्या तोफ़ा तिथून काढून गडावर नेण्यात आल्या. रेडजाई देवीच्या मंदिरा जवळ एक सिमेंटचा चौथरा बांधून त्यावर तोफ़ा ठेवण्यात आल्या आहेत.

रेडजाई देवीच्या मंदिरा जवळ ठेवलेल्या तोफा

जवळचे किल्ले 😍

  1. नवतेदुर्ग
  2. माणिकदूर्ग
  3. बारवाई
  4. कोळकेवाडी

कसे जाल ? 🚶🏻

चिपळूण शहरापासून २ कि.मी वर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे करंजेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत रिक्षा मिळतात. मंदिरामागील पायर्‍यांच्या मार्गाने १५ मिनीटात गडावर जाता येते.

  • राहाण्याची सोय : (Gowalkot)गडावर राहण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : (Gowalkot)गडावर जेवणाची सोय नाही.
  • पाण्याची सोय : (Gowalkot)गडावर पिण्याचे पाणी नाही.

Google Map 🌎

लोकेशन पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search