धारावी किल्ला (Dharavi Fort)

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात असलेला धारावी किल्ला (Dharavi fort). वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा हा धारावी किल्ला, भाइंदर जवळ आहे. किल्ला बांधल्यापासून इथे अनेक रोमहर्षक लढाया झाल्या.

उंची : १९० फूट ⛰️

इतिहास 🚩

● १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेट जिंकून घेतले.
● बेट जिंकल्यावर तिथे मराठ्यांनी किल्ला बांधायला सुरवात केली.
● २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे.
● पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला.
● पुढे पोर्तुगिजांनीच हा (Dharavi fort) किल्ला बांधून घेतला.

● पुढे ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला.
● पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला.
● चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता.
● शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला (Dharavi fort) जिंकून घेतला.

● इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला.

स्थळदर्शन 😍

◆ सध्याच्या घडीला या किल्ल्याचे खूप कमी अवशेष शिल्लक राहिले आहे.
◆ किल्ल्याच्या जवळ आल्यावर आपल्याला एकमेव बुरुज दिसतो.
◆ या बुरुजावर पोर्तुगिजांच्या कार्यालयाचे अवशेष आहेत.
◆ हा बुरुज पाहून गडमाथ्यावर आल्यावर बाग लागते.
◆ या बागेत तटबंदीचे काही अवशेष दिसतात.

◆ किल्ल्याच्या माथ्यावरुन पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईचा किल्ला व मध्ये असलेली वसईची खाडी दिसते.

जवळचे किल्ले 🤩

  1. वसईचा किल्ला
  2. डोंगरी किल्ला
  3. वज्रगड

कसे जाल? 🚶

पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर उतरुन उत्तनला जाणार्‍या बस क्र १ व ४ ने धारावी गडावर जाता येते.

  • राहाण्याची सोय : किल्ल्यात राहण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
  • पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

1 Comment

  • राजन पाटील
    4 years ago Reply

    डोंगरी-चौक येथील किल्ले धारावी बद्दल दुर्मिळ माहिती मिळाली. अतिशय अभिमान वाटला. धन्यवाद, जय जिजाऊ

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search