चंदन-वंदन (Chandan-Vandan)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असलेली दुर्गजोडी म्हणजेच चंदन-वंदन (Chandan-Vandan) किल्ले. चित्रपटांमध्ये तसेच खऱ्या आयुष्यातही आपण जुळे भाऊ बघतो, तसेच काही या किल्ल्यांबाबत आपल्याला दिसते. हे दोन्ही किल्ले एकसारखे दिसून येतात. सातार्यापासून २४ कि.मी अंतरावर या जुळ्या किल्ल्यांची दुर्गजोडी उभी आहे.
उंची : ३८०० फूट ⛰️
इतिहास 🚩
● ११९१ – ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे दोन्ही (Chandan-Vandan) किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधून घेतले आहेत.
● पुढे हा किल्ला यादवांच्या राज्यात असावा असे सांगितले जाते.
● यादवांच्या पतनानंतर हा (Chandan-Vandan) किल्ला आदिलशाहीत गेला.
● १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले.
● काही संशोधकांच्या द्वारे महाराजांनी १६७३ साली हे किल्ला स्वराज्यात आणला असे सांगण्यात येते.
● पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदनवंदन येथे असणार्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला.
● परंतु हे किल्ले त्यांना जिंकता आले नाहीत.
● पुढे १६८९ पर्यंत हा (Chandan-Vandan) सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता.
● पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
● पुढे मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला.
● या पुढे १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला.
स्थळदर्शन 😍
◆ चंदन किल्ल्यावर जाताना आपल्याला प्रवेशद्वाराजवळ मशीद आहे.
◆ पुढे दोन अर्धवट पडलेले बुरूज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात.
◆ येथून पुढे काही पायर्या चढून गेले असता, डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते.
◆ येथून वरच्या बाजूला एक वडाचे झाड आहे. पाच वडांच्या या एकत्र संग्रहाला पाचवड असे म्हणतात.
◆ बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत.
◆ चंदनप्रमाणे वंदन किल्ल्यावरही एक मशीद आहे.
◆ येथून बाजूलाच एक पडकी वास्तू आपल्याला दिसते.
◆ प्रथमदर्शनी पाहता एखाद्या इमारतीसारखी दिसणारी ही वास्तू जवळून पाहिल्यास प्रवेशद्वार असावे असे वाटते.
◆ याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात.
◆ गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो.
◆ याच वाटेवर एक समाधी आढळते, याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे.
◆ गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते.
◆ गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे.
विशेष 🤩
★ चंदन-वंदन (Chandan-Vandan) या नावाने प्रसिद्ध असणारे हे किल्ले जुळे किल्ले म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत.
जवळचे किल्ले 😍
कसे जाल? 🚶♂️
चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणार्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे – सातारा मार्गावर भुइंज गाव आहे. तेथुन २० कि.मी अंतरावर किकली गाव आहे. वाई आणि सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहेत. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची, येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन किल्ला आहे.
- राहाण्याची सोय : दर्ग्यात रहायचे असल्यास ३० ते ४० जणांना रहाता येते.
- जेवणाची सोय : गडावर जेवणाची व्यवस्था नाही, आपण स्वत: करावी.
- पाण्याची सोय : पाण्याची सोय फक्त पावसाळ्यात आहे, अन्यथा गडावर पाणी नाही.
वैराटगड (Vairatgad) - trekkers ig
4 years ago[…] चंदन-वंदन […]