यावलचा भुईकोट किल्ला (Yawal fort)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात असेलेला यावलचा भुईकोट (Yawal fort) किल्ला. चोपडा – बुऱ्हाणपूर या मार्गावर यावल हे गाव वसलेले आहे आणि याच गावात हडकाई आणि खडकाई नदीच्या संगमाजवळच असणाऱ्या टेकडीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे. या किल्ल्याला राजे निंबाळकर गढी किंवा निंबाळकर राजेंचा किल्ला असेही म्हणतात.
उंची : १००० फूट ⛰️
इतिहास 🚩
● हा (Yawal fort) किल्ला कोणी बांधला याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.
● येथे १७८८ ते १८४३ या दरम्यान सूर्याजी राजे निंबाळकर यांचे राज्य होते असा उल्लेख आहे.
स्थळदर्शन 😍
◆ यावल गावातून सरळ एक रस्ता या (Yawal fort) किल्ल्याकडे जातो.
◆ हा किल्ला जवळ जवळ गावाच्या बाहेर असून तो नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे.
◆ किल्ल्याकडे जाताना आपल्याला न्यायालय दिसते.
◆ या न्यायालयाची इमारत किल्ल्याच्या एकदम बाजूलाच उभी आहे.
◆ न्यायालयाजवळ पोहोचल्यावर डाव्या बाजूला किल्ल्याचे दोन भव्य बुरुज आणि तटबंदी आपल्याला दिसते.
◆ किल्ल्याचे सर्व बुरुज आणि तटबंदी ही खालच्या बाजूला दगडात व वरच्या बाजूला विटांनी बांधलेली आपल्याला दिसते.
◆ झुडूपातून जाणाऱ्या पायवाटेने २ मिनिटे चढून गेल्यावर आपला उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करता येतो.
◆ पुढे वाट काटकोनात वळते आणि आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो.
◆ गडाचा उपयोग गडाखालच्या वस्तीकडून प्रातर्विधीसाठी केला जातो. यामुळे गडाची अवस्था अतिशय खराब आहे.
◆ गडावर उध्वस्त वास्तूंचे चौथरे आहेत.
◆ गडावर दोन दगडात बांधलेली पाण्याची कोरडी टाकी आपल्याला पाहायला मिळतात.
◆ या गडाला एकूण ७ बुरुज आहेत.
◆ यातील काही बुरुज ढासळलेले असून काही अजूनही सुस्थितीत आहेत.
जवळचे किल्ले 🤩
- सराईचा किल्ला
- पालचा किल्ला
- अमळनेर
- पारोळा
- रसाळपूर
- वेताळवाडी किल्ला
कसे जाल? 🚶♂️
यावल जवळचे सर्वात मोठे गाव आणि रेल्वे स्टेशन भुसावळ हे आहे. भुसावळ – यावल अंतर १९ किलोमीटर आहे. भुसावळहून एसटी बसने यावलला जाता येते.
- राहाण्याची सोय : (Yawal fort) किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही.
- जेवणाची सोय : यावल गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
- पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
Veer
2 years agoनदीचे मुख्य नाव हडकाई खडकाई नसून
त्या नद्यांचे नाव हरिता व सरिता असे आहे.