सिंहगड (Sinhgad)

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सिंहगड (sinhgad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे.

उंची : ४४०० फूट ⛰️

इतिहास 🚩

● हा किल्ला २००० वर्षांपूर्वी बांधला गेला असावा असे तेथील मंदिरांच्या कोरीव कामावरून लक्षात येते.
● पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव या किल्ल्यावर सुभेदार होते.
● यानंतर सिद्धी अंबर हा सुभेदार होता त्याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराज्यात आणला.
● पुढे इ. स. १६४९ मध्ये शहाजी राजांना सोडवण्यासाठी महाराजांनी किल्ला आदिलशहाला दिला.
● पुढे इ.स. १६५६ मध्ये पुन्हा घेतला.
● पुढे पुरंदरच्या तहात हा किल्ला (sinhgad) शिवाजी महाराजांना मोगलांना द्यावा लागला.
● १६७० मध्ये तानाजी मालुसरे यांनी सिंहगड परत स्वराज्यात आणला.

● या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:

तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळियांचा होता. त्याने कबूल केले की, ‘कोंढाणा आपण घेतो’ , असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले.

उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही, मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून, कुल लोक सावरून, उरले राजपुत मारिले, किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजाना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली. तेव्हा ते म्हणाले ,‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला‘ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.


● इ.स. १६८९ च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला.
● पण पुढे चार वर्षांनी १६९३ मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंडाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला.
● शनिवार दि २ मार्च इस १७०० या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले
● पुढे १७०३ मध्ये औरंगजेबाने हा किल्ला (sinhgad) जिंकून घेतला.
● १७०७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला (sinhgad) जिंकून घेतला.
● पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला देखील ताब्यात घेतला.

स्थळदर्शन😍

◆ खांद कडा
◆ पुणे दरवाजा
◆ दारूचे कोठार
◆ टिळक बंगला
◆ कोंढाणेश्वर :-हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते.
◆ श्री अमृतेश्वर भैरव मंदिर :-
◆ देवटाकेदेव टाके
◆ कल्याण दरवाजा
◆ उदेभानाचे स्मारक
◆ झुंजार बुरूज
◆ डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा
◆ राजाराम स्मारक
◆ तानाजींचे स्मारक
◆ देवटाके

विशेष 🤩

सिंहगड (sinhgad) किल्ल्याचे दुसरे नाव कोंढाणा आहे.
★ तानाजींच्या बलिदाना नंतर छ. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव “सिंहगड” ठेवले अशी आख्यायिका आहे. पण कोंढणा किल्ल्याचे सिंहगड हे नाव त्यापूर्वीच प्रचलित होते असे ऐतिहसिक कागदपत्रां वरुन सिध्द होते. खुद्द छ. शिवाजी महाराजींनी ०३/०४/१६६३ रोजी मोरो त्रिमळ पेशवे आणि राजश्री निळो सोनदेऊ मुजूमदार यांना लिहीलेल्या पत्रात,” तुम्ही लष्करी लोकानसी व खासकेली हशमानसी कागद देखताच स्वार होवून किले सिंहगडास जाणे”. असा सिंहगडाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

कसे जाल ? 🕺🏼

१) पुणे – कोंढणपूर मार्गे :-
पुणे – कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

२) पुणे दरवाजा मार्गे :-
पुणे – सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

  • राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : गडावरील हॉटेल्समध्ये जेवणाची सोय होते.
  • पाण्याची सोय : देव टाक्यांमधील पाणी बारा महिने पुरते.



Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search