पारोळा (parola)

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा (parola) हा सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचे भुईकोट व बालेकिल्ला अशे दोन भाग आहेत. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट; तर रुंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते.

उंची : ० फूट
इतिहास 🚩

● या किल्ल्याचे बांधकाम जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी इ.स १७२७ मध्ये केले.
● इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी हा भाग जिंकून घेतला, पण किल्ला जहागिरदारांच्या ताब्यात ठेवला.
● इ.स १८२१ मध्ये पारोळ्यात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यात आले.

● ते बंड मोडून इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला.

पाहण्यासारखे 😍

◆ उत्तराभिमुख दरवाजाने किल्ल्यात आत जाता येते.
◆ आत गेल्यावर १५ फूट उंचीची तटबंदी दिसते.
◆ काटकोनात वळून पुढे गेल्यावर अजून एक दरवाजा येतो.
◆ इथून आत गेल्यावर समोर बालेकिल्ला आहे.

parola

◆ बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २५ फूटी भव्य बुरुज आहेत.
◆ या बुरुजांच्या मध्ये चार चौकानी बुरुज आहेत.
◆ बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो.
◆ गडात एक गणपतीचे मंदिर आणि एक महादेवाचे मंदिर आहे.

parola

◆ महादेव मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत.
◆ गडात पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूस तलाव आहे. ज्यात दोन चोरदरवाजे आहेत.
◆ बालेकिल्ल्यावर दक्षिणेकडील तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात.

◆ गडात एक दारूकोठारही आहे.

विशेष 🤩

पारोळा (parola) शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. शहराच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. झाशीच्या राणीचे वंशज म्हणजेच तांबे घराणे याच गावात आहे.

कसे जाल ? 🕺🏼

धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. अंमळनेर पासून पारोळा (parola) २२ किमीवर आहे. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे.

  • राहाण्याची सोय :गडावर राहण्याची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.
  • जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.
  • पाण्याची सोय :गडावर पाण्याची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search