जामगावचा भुईकोट ( Jamgaon fort )

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगावचा भुईकोट ( jamgaon fort ) किल्ला आहे.

उंची : ० फूट

इतिहास 🚩

● हा किल्ला महादजी शिंदे यांनी बांधून घेतला आहे.
● पुढे महादजी शिंदे यांचे वंशज जिवाजीराव शिंदे यांनी हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस केला.
● आजही ह्या किल्ल्यात रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरते.

पाहण्यासारखे 😍

◆ किल्ल्याला २० बुरुज आहेत.
◆ किल्ल्याला एकूण ४ दरवाजे आहेत.
◆ त्यातील ३ दरवाजे बंद केलेले असून एकाच दरवाजातून किल्ल्यात जाता येते.
◆ किल्ल्यात श्रीरामाचे मंदिर आहे व हनुमानाचे मंदिरही आहे.
◆ किल्ल्यात विठ्ठल रखुमाईचे मंदिरही आहे.
◆ आधी या किल्ल्यात पूर्ण जामगाव असल्याने बऱ्याच वास्तूंचे चौथरे आहेत.
◆ किल्ल्यात ३ कमानी असलेली मशिदीची इमारत आहे.
◆ किल्ल्यात महादजी शिंदे यांचा दोन मजली प्रशस्त वाडा आहे.
◆ वाड्यासार एक मोठी विहीर आहे.
◆ वाड्याच्या गच्ची वरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसतो.

महादजी शिंदे यांचा वाडा

विशेष 🤩

हा किल्ला ८६ एकर परिसरात पसरलेला आहे.

कसे जाल ? 🕺🏼

कल्याण नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता पारनेरला जातो. पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला ( jamgaon fort )आहे.

  • राहाण्याची सोय : किल्ल्यात राहाण्याची व्यवस्था नाही.
  • जेवणाची सोय : पारनेरला जेवणाची व्यवस्था होते.
  • पाण्याची सोय : किल्ल्यात पाण्याची व्यवस्था नाही

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search