कमळगड किल्ला (Kamalgad fort)
भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या सातारा जिल्ह्यातील एक उंच आणि महाबळेश्वरच्या डोंगररांगेतील एक सुंदर दागिना असलेला किल्ला म्हणजेच कमळगड (Kamalgad). धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.
उंची : ४२०० फूट ⛰️
इतिहास 🚩
● कमळगड (Kamalgad) किल्ला कोणी बांधला याबद्दल माहिती उपलब्ध नाही.
● मराठा साम्राज्याच्या वेळी हा (Kamalgad) किल्ला विजापूरच्या मोकासदार यांच्याकडे असल्याचा उल्लेख आहे.
● मोडी लिपीत असलेल्या उल्लेखांवरून या किल्ल्याचे नाव कत्तलगड असल्याचे समजते.
● १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला.
स्थळदर्शन 😍
◆ आकोशी गावातून दिड ते पावणे दोन तासाच्या चालीनंतर आपण गडावरील लोखंडी शिडीपाशी पोहोचतो.
◆ शिडी चढून गेल्यावर गडमाथ्याच्या सपाटीवरून आजुबाजूचा डोंगरदर्यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो.
◆ गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात.
◆ पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते.
◆ त्याला आत उतरायला मजबूत पायर्याही आहेत. हिलाच गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात.
◆ विहिरीच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेले टाके आहे.
◆ गडावर एक गोरक्षनाथांचे मंदिरसुद्धा आहे.
◆ गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे.
विशेष 🤩
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी अशी ही गेरूची किंवा कावेची गुहा या (Kamalgad) किल्ल्यावर आहे.
कसे जाल ? 🚶
१) आकोशी मार्गे :- वाई ते आकोशी अंतर ३५ किलोमीटर आहे. आकोशी गावाच्या पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला दिसणार्या डोंगर रांगेवर चढून जाण्यास पाऊण तास लागतो.
२) वासोळ्या मार्गे:- उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोर्यातील असरे, रानोला, वासोळे या गावात वाईहून एसटीने तासभरात पोहोचता येते. वासोळ्यावरुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
३) वाईहून – नांदवणे मार्गे :- वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९३० वाजता एसटी बस आहे. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.
४) महाबळेश्वर – नांदवणे मार्गे :- महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट वरून खाली येणार्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्यात उतरले की, सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते
- राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच – सहा जण राहू शकतात.
- जेवणाची सोय : जेवणाची व्यवस्था आपण स्वतःच करावी.
- पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे.