अजिंक्यतारा (Ajinkyatara)
अजिंक्यतारा (Ajinkyatara) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यतार्याची साधारणत: उंची ३०० मीटर असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
उंची : ९८५ फूट ⛰
इतिहास 🚩
● हा किल्ला शिलाहार वंशातल्या दुसर्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला.
● पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला.
● राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला.
● इ.स. १७०० मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याच नाव आझमतारा असा बदलण्यात आले.
● मात्र लगेच महाराणी ताराराणी यांनी हा किल्ला परत जिंकून त्याचे नाव अजिंक्यतारा केले.
● १७०७ साली कैदेतून सुटून आलेल्या शाहू महाराजांनी हा किल्ला घेतला आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.
● पुढे दुसरे शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर १८१८ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
स्थळदर्शन 😍
◆ सातार्याहून गडावर प्रवेश करताना मार्गावर दोन दरवाजे आहेत.
◆ या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा आजही सुस्थितीत असल्याचे आपल्याला दिसते.
◆ दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत.
◆ दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे.
◆ दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते.
◆ समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत.
◆ पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते.
◆ या वाटेत ढासाळलेला राजवाडा आहे.
◆ येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते.
◆ मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.
◆ मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात.
◆ या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे.
◆ गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत.
◆ या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते.
◆ दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते.
◆ गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते.
विशेष 🤩
★ अजिंक्यतारा(Ajinkyatara) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी.
जवळचे किल्ले 😍
कसे जाल ?🕺🏼
सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणार्या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते किंवा आपण दुचाकीने सुद्धा अजिंक्यताऱ्यावर जाता येते. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. अजिंक्यतारा (Ajinkyatara) किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्तासुद्धा आहे.
- राहाण्याची सोय : (Ajinkyatara)गडावर रहाता येत नाही.
- जेवणाची सोय : जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करावी.
- पाण्याची सोय : पाण्याची सोय स्वतः करावी.