सिंधुदुर्ग (Sindhudurg)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात “सिंधुदुर्ग” हा जलदुर्ग आहे. मालवणच्या समुद्रात कुरटे बेटावर ४८ एकर परिसरात हा किल्ला बांधला गेला आहे. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला.
उंची : ० फूट
इतिहास 🚩
● दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्यावर या (Sindhudurg) जलदुर्गाच्या बांधणीचे काम सुरु झाले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तिथे उपस्तित होते.
● या गडाचे बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी केले आहे.
● किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर यांनी ३ वर्षे अहोरात्र मेहनत केली होती.
● सिंधुदुर्ग (Sindhudurg) किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले.
● पुढे शाहू आणि ताराराणी यांच्यात झालेल्या तहानुसार हा (Sindhudurg) किल्ला ताराराणींच्या ताब्यात आला.
● १७६५ साली इंग्रजांनी हा (Sindhudurg) गड जिंकून घेतला.
● पुढे १७६६ साली कोल्हापूरच्या राणी जिजाबाई आणि इंग्रजांमध्ये झालेल्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला.
● निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा (Sindhudurg) गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले ‘‘फोर्ट ऑगस्टस‘‘.
स्थळदर्शन 😍
◆ सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा हा गोमुखी पद्धतीचा आहे.
◆ किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे.
◆ महाद्वाराच्यावर आपल्याला नगारखाना दिसतो.
◆ महादरवाज्यातून आत गेल्यावर घुमटी आहेत.
◆ एका घुमटी मध्ये महाराजांच्या डाव्या पायाचा आणि दुसऱ्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे.
◆ किल्ल्यावर एक जरिमरीचे मंदिर आहे.
◆ छत्रपती राजाराम राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं “श्रीशिवराजेश्वराचे” मंदिर या किल्ल्यावर बांधून घेतलं आहे.
◆ शिवराजेश्वर मंदिराच्या मागे श्री महादेव मंदिर व मंदिरातच असलेली विहीर आहे.
◆ गडावर साखरबाव, दुधबाव व दहीबाव ह्या गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत.
◆ विहीरींच्या पुढे शिवरायांच्या वाड्याचे जोते आहे.
◆ वाडयाच्या अवशेषांमागे दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज आहे.
◆ बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे.
◆ बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे.
◆ दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात.
◆ या दरवाजाच्या समोरच्या बाजूस चुन्याचा घाणा आणि चुना साठवण्याचे हौद आहे.
◆ पुढे आपल्याला भगवती देवीच्या मंदिरही पाहायला मिळते.
◆ प्रवेशव्दार पासून चौथ्या बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने थेट समुद्रात उतरता येत असे. आज हा दरवाजा दगडांनी चिणून बंद करण्यात आलेला आहे.
◆ किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची रूंदी ३ ते ४ मीटर आहे.
◆ नागमोडी तटबंदीची लांबी अंदाजे ४ किमी आहे.
◆ किल्ल्याच्या तटबंदीत ४५ अरुंद जिने आहेत व ४० शौचकुप (शौचालय) आहेत.
विशेष 🤩
छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनूर लुटले होते, ती नौदल स्वारी याच सिंधुदुर्ग किल्ल्यावरूनच केली होती.
शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत किल्ल्याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
कसे जाल ? 🕺🏼
कोकण रेल्वेने सिंधुदुर्ग किंवा कुडाळ स्थानकात उतरुन रिक्षाने किंवा एसटीने मालवणला (अंतर २६ किमी) जाता येते.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी मालवणहून बोटी मिळतात.
- राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही , पण मालवण शहरात हॉटेल्स आणि होम स्टे आहेत.
- जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. मालवण शहरात आहे.
- पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी मिळते.