1 ते 31 ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष (Shivkalin Dinvishesh August)

१ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १७६० मराठा सेना, पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत येऊन पोहोचली.

(Shivkalin Dinvishesh August)

२ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६४८ छत्रपती शिवरायांनी “शिरवळ” ठाणे ताब्यात घेतले.

👉 १६७७ दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी “वेलवान्सोरचा किल्ला” ताब्यात घेतला.

👉 १६८० मे महिन्याच्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती, शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते.

त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गावात छापा टाकून तेथील तीन माणसांना पकडले होते. डिचोलीच्या मराठी सुभेदारानी सिओलिम गावात छापा टाकण्याची तारीख होती २ ऑगस्ट १६८०

👉 १७६० २ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.

(Shivkalin Dinvishesh August)

३ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६७७ छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला.

(Shivkalin Dinvishesh August)

४ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६८ शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले.

👉 १७३० भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म. भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर, दि. ४ ऑगस्ट १७३० रोजी चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला.

(Shivkalin Dinvishesh August)

५ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील “खोपडे देशमुख” हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच “खोपडे देशमुख” घराण्यात नेहमीच भाऊबंदकीचा वाद व्हायचा पण शिवरायांच्या मध्यस्तीने व सामंजस्याने हा वाद पूर्णपणे मिटवला गेला.

👉 १६७७ छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते.

👉 १६८९ नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती पद मिळाले.

(Shivkalin Dinvishesh August)

६ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६४८ छत्रपती शिवरायांनी “किल्ले पुरंदर” वर हल्ला केला किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.

👉 १६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला.

👉 १६५९ ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला ‘मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान’ असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद-

“शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत.”

👉 १६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्तीला आले. या मुक्कामात महाराजांना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते.

(Shivkalin Dinvishesh August)

७ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६७५ छत्रपती श्री शिवरायांनी “कोल्हापूर” जिंकले.

👉 १६७९ छत्रपती श्री शिवरायांच्या सूचनेवरून “खांदेरी-उंदेरी” किल्ल्यावर गोड्या पाण्याचे झरे खोदून तिथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले.

(Shivkalin Dinvishesh August)

८ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६७६ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून “किल्ले महीपतगड” वर हवालदार “दसमाजी नरसाळा” यांस तर “किल्ले सज्जनगड” वर हवालदार “जिजोजी काटकर” यांस कारभाराविषयी पत्र.

👉 १६८३ संभाजीराजांनी पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला.

(Shivkalin Dinvishesh August)

९ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५४ शिवाजीराजांनी निळोपंताना पुरंदरसाठी इनामपत्र दिले. हे पत्र खालील प्रमाणे
मसरूल हजरत अखंडित लक्ष्मी राजमान्य नीळकंठराऊ प्रती राजेश्री सिवाजी राजे दंडवत ।। उपरी ।। तुम्ही राजेश्री बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिल्याप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले व कित्येक मुखवचने नाईक माइले हाती सांगोन पाठविले तिही सविस्तर सांगितले व नाईक बोलिले की आम्ही त्यांसी तह केला आहे की जैसे काही राऊ गोसावी साहेबांसी वर्तत होते तैसेची हेही साहेबांसी वर्ततील व साहेब जैसे राजश्री राऊ गोसावी यांचे चालवत होते तैसेच यांचेही चालवावे ऐसा निश्चय करून आपण आलो असो म्हणऊन बोलिले ।।

तरी जे काही बाबाजी नाईक तुम्हासी निश्चय केला तोच आमचा निश्चय आहे ।। जैसे काही राऊ गोसावी आम्हासी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हास वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राऊ गोसावी यांचे चालवित होतो तैसेच तुमचे चालऊन ।। एविशई आम्हास श्रीची व राजश्री साहेबांच्या पायांची व सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायांची आण असे व ये विशयी श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमान वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तोन ।। तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही ।।छ ६ सौवाल सु।। खमस खमसैन अलफ ।। हे पत्र पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले दिसते.

(Shivkalin Dinvishesh August)

१० ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६० “छत्रपती शिवराय” किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर त्यांच्या पाठलागावर “सिद्दी जौहर” स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.

👉 १६६६ “छत्रपती शिवराय” आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.

👉 १७४९ चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे.

👉 १७५५ थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म.

👉 १७६० सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.

(Shivkalin Dinvishesh August)

११ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १८०३ इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लाच देऊन घेतला.

(Shivkalin Dinvishesh August)

१२ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५७ शिवरायांनी तत्कालिन बारा मावळ आणि भोर तालुक्यातील खेडेबारे हा मुलुख जिंकला.

👉 १७६५ बादशह शुजाउद्दोकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले.

(Shivkalin Dinvishesh August)

१३ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५७ विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना किल्ले सिंहगड आदिलशहाला द्यावा लागला होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला.

👉 १६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे कुंवर रामसिंग हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.

(Shivkalin Dinvishesh August)

१४ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र “मुरादबक्ष” याचे पत्र.

👉 १६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला.

👉 १६५७ मराठ्यांनी कोकणातील “दंडाराजपुरी” जिंकली पण “किल्ले जंजिरा” वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला.
या मोहीमेत “शामराव रांझेकर” आणि “बाजी घोलप” या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.

👉 १६६० १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी संग्रामदुर्गाचे तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली.

(Shivkalin Dinvishesh August)

१५ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५६ शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई, हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला.

👉 १६६० शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला सुमारे ५५ दिवसांच्या प्रखर संघर्षानंतर हाती आलेला संग्रामदुर्गाची पाहणी करण्यासाठी शाहिस्तेखान किल्ल्यावर आला. संपूर्ण पाहणी करून त्याने या किल्ल्याचे नाव ठेवले “इस्लामगड”.

👉 १६६६ छत्रपती शिवरायांनी आग्रा कैदेत असताना आपली मौलिक संपत्ती वस्तू, जडजवाहीर मुलुकचंद सराफामार्फत स्वराज्याकडे पाठवून दिली. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या लवकरच आग्रा सोडून दक्खनेत निघण्याची गुप्त खलबते राजांच्या डोक्यात चालू होती.

(Shivkalin Dinvishesh August)

१६ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६२ अनाजीपंत स्वराज्याचे नूतन सुरनिस झाले.

👉 १६६६ दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले. मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करीन. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता. कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सलतनतीस अनपेक्षितच होते.

👉 १६८१ आतापर्यंत केवळ मराठी मुलखाचीच नासधूस करणारा सिद्दी १६ ऑगस्ट पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला.

👉 १७०० बादशहाचे हाल पाहून मराठ्यांना जास्तच चेव चढला. सभोवार घिरट्या घालून त्यांनी शक्य तितक्या उच्छाद चालवला. हनुमंतराव निंबाळकरानी १६ ऑगस्ट रोजी “खटाव” ठाणे काबीज केले व तेथे मोगलांच्या बाजूने असणार्या मराठी अधिकार्याला ठार मारले.

(Shivkalin Dinvishesh August)

१७ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६० आदिलशहाने शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.

👉 १६६६ शिवराय आग्र्याहून सुखरूप बाहेर निघाले. रक्ताचा एक थेंबही न सांडता मुघल सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभूमीत केलेला दारुण व अब्रूचे धिंडवडे काढणारा पराभव म्हणजेच शिवराय आणि शंभूराजे यांची आग्र्यातून सुखरूप सुटका

(Shivkalin Dinvishesh August)

१८ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६६ आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते. तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या.

👉 १६६६ आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली,त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकीशन, जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत, त्रंबकपंत व इतर दोन चाकर(बहुतेक हिरोजी व मदारी) हेही फौलादखानाच्या हाती सापडले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केला.

👉 १६८३ मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले.

👉 १७०० महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म.

(Shivkalin Dinvishesh August)

१९ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६६ शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटले आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि. १९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेतोजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.

👉 १६७५ शिवरायांनी “प्रभावळी” ची सुभेदारी “जिवाजी विनायक” यांना दिली.

👉 १६८९ राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले.

👉 १७५३ रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले.

(Shivkalin Dinvishesh August)

२० ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६६ शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी ‘नरवीर घाटी’ हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले. ह्या ठिकाणी ठाणेदार होता लतीफखान.

👉 १६६६ औरंगजेब बादशहाने “मिर्झाराजे जयसिंग” यांना फर्मान पाठवून आग्रा कैदेतून छत्रपती शिवराय निसटण्यामागे “कुंवर रामसिंग” जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.

👉 १६८४ शहजादा अकबराने कवी कलशाला पत्र पाठवून त्याच्या तब्येतीची, भिमगडाच्या तहाची, मुहम्मद अज्जमच्या वकीलासोबत काय ठरले इ. गोष्टींची चौकशी केली.

(Shivkalin Dinvishesh August)

२१ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६१ सर्व सरकारी कारकूनांना पालखीचा मान! पावसाळा सुरू झाल्याने महाराजांनी प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी, प्रशासन व्यवस्थेत लक्ष घातले. आजच्या दिवशी राजगडी वास्तव्यास असताना शिवरायांनी रामराजपंतांच्या जागी “नरहरी आनंदराव” यांना पेशवेपदी नेमले, तर “अनाजीपंतास” वाकनिशी दिली. तसेच इतर काही मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.

👉 १६८१ औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” ही पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले.

👉 १६८२ “किल्ले रामशेज” मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार “कासीमखान” याने किल्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले.

👉 १६८८ माहुली गड मुघलांच्या ताब्यात गेला.

(Shivkalin Dinvishesh August)

२२ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६३२ विजापूरच्या आदिलशहाचा वजीर मुरार जगदेव याने परांडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली ५५ टन वजन असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली.

👉 १६३९ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

👉 १६६० छत्रपती शिवाजी महाराज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरात दाखल. शिवाजी महाराजांनी येथे दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत.

(Shivkalin Dinvishesh August)

२३ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६३ शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे जिंकून ताब्यात घेतले.

👉 १६६६ शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेनंतर मुघल सैनिकांनी कवी परमानंद यांना दौसा येथून ताब्यात घेतले.

(Shivkalin Dinvishesh August)

२४ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५७ औरंगजेबाकडून सर्व आदिलशाही बुडवली गेली तर तो अधिक प्रबळ बनेल व शहाजहाननंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून त्याची ताकद वाढेल, म्हणून दारा शुकोहने शहाजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला.

👉 १६६१ छत्रपती शिवरायांच्या पत्नी “सकवारबाई साहेब” यांना कन्यारत्न प्राप्त झाले.

👉 १६७७ “दक्षिण दिग्विजय मोहीम” छत्रपती शिवरायांनी उत्तर कर्नाटकचा काही भाग जिंकला.

👉 १६८० राजसत्ता हातात आल्यावर संभाजीराजांनी साधूसंताबद्दल आदर व पूज्यभाव प्रकट केला त्याचवेळी म्हणजेच मंचका रोहाणानंतर १ महिन्याने म्हणजेच (२४ ऑगस्ट १६८०, शके १६०२ भाद्रपद शुध्द दशमी, सोमवार) या दिवशी संभाजीराजांनी पूर्वी राज्याधिकार प्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्याच्या इच्छेने ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ, ग्रामनिवासी बाकरे शास्त्री जामदग्न्य गोत्री आश्वलायन सूत्री हृग्वेदांतर्गत सकल शाखाध्यायी, कुऱ्हाडे, ब्राम्हण, परशुराम क्षेत्रातील कुडाळ येथील नाग्रोपाध्याय, बाकरे आडनावाचे नामदेव मट्टाचे पुत्र, महाशय सर्व मान्त्रीकात श्रेष्ठ यांना प्रतिवर्षी १०,००० होणांचे दानपत्र करून दिले.

(Shivkalin Dinvishesh August)

२५ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५७ कोकणातील किल्ले जंजिरा या जलदुर्गावर मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यात किल्ल्याच्या तटाला मोठ्या हिमतीने शिड्या लावलेल्या श्यामरावांचा आणि बाजी घोलप यांचा शिवरायांनी सन्मान केला. रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही.

👉 १६७४ मराठ्यांनी फोंडा किल्ल्यावर हल्ला केला.

👉 १६७६ छत्रपती शिवाजीराजांनी पुन्हा जंजिरा मोहीम हाती घेण्याचे ठरवले. त्यासाठी पेशवे मोरोपंत यांना १० हजार फौज देऊन जंजिऱ्यावर पाठवले. या मोहिमेत लाय पाटलांनी जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावून पराक्रम गाजवला त्यांना राजांनी छत्री, निशाण आणि पालखी देऊ केली पण पाटलांनी ती नाकारल्याने त्यांना पालखी नावाचे गलबत बांधून दिले.

(Shivkalin Dinvishesh August)

२६ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६५ आजच्या दिवशी शिवाजीराजांनी मालंड बंदर जिंकले.

👉 १६७९ मराठी मुलखात लूटमार करणाऱ्या सिद्दीला मदत करणाऱ्या इंगजाना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई बंदराजवळ खांदेरी उंदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले.

👉 १७०० मार्च १७०० ला सिंहगड मुक्कामी छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या बाल शाहूराजेना ही बातमी समजताच त्यांना खूप दुःख झाले. औरंगजेबाची छावणी यावेळी खवासपूरला होती. छावणीत असलेली शाहूराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने आजारी पडले. दरबारात आल्यावर शाहूराजेंचे अंग पिवळे पडल्याचे दिसताच बादशाहाने चौकशी करताना त्याला खोजा हाफिज अंबर कडून कारण की राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी समजल्याने ते अन्न खात नव्हते. मोगल दरबारच्या अखबारातील या नोंदीची तारीख होती २६ ऑगस्ट १७००.

(Shivkalin Dinvishesh August)

२७ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५६ रायगड फत्ते करून शिवाजी राजांनी चंद्रराव मोर्‍याची मग्रूर गर्दन उडवली.

👉 १६८३ गोव्याच्या पोर्तुगीज व्होईसरॉय याने जाहीर केले की, “संभाजीराजे मोठे सैन्य घेऊन गोव्यावर चाल करून येणार आहेत तरी सर्वांनी गोव्याच्या संरक्षणाच्या व्यवस्थेस लागावे”.

👉 १६८५ उत्तर कोकणातील संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा काही प्रदेश व किल्ले काबीज केले होते. त्यातीलच “ किल्ले जीवधन” आजच्या दिवशी पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून परत मिळवला.

👉 १६९० किल्ले जिंजीस जुल्फिकार खानाचे वेढे पडले.

(Shivkalin Dinvishesh August)

२८ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६७ औरंगजेब बादशहाच्या आदेशाने मिर्झाराजे जयसिंग यांच्यावर बुऱ्हाणपूर येथे विषप्रयोग करून त्यांना ठार करण्यात आले.

👉 १६८२ दंडाराजपुरीचा फौजदार याकुतखान व खैरातखान ह्यास देण्याकरिता उत्तम पोशाख बहरामंदखानाच्या हवाली करण्यात आला.

👉 १६८२ सिद्दीने मराठ्यांच्या ( नागोठणे ) प्रदेशात घुसून अनेक लोकांना त्रास दिला. बर्याच लोकांची नाके कापून एका हवालदाराला पकडून मुंबईस नेले.

(Shivkalin Dinvishesh August)

२९ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६६६ आग्रा सुटकेनंतर मुघल सैन्याने शिवरायांचे मावळे समजून भलत्याच तीघा व्यक्तींना घोलपूर येथे अटक केली.

👉 १६६७ शिवाजीराजे किल्ले रायगडवर मुक्कामी आले.

(Shivkalin Dinvishesh August)

३० ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६५८ शिवरायांनी आपले वकील “सोनोपंत डबीर” यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे काही प्रश्नांसहीत पत्र घेऊन पाठवले. ३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले.

(Shivkalin Dinvishesh August)

३१ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

👉 १६७६ छत्रपती श्री शिवरायांनी कर्नाटक मधील बेळगावी जिल्ह्यातील अथनी वर स्वारी केली.

(Shivkalin Dinvishesh August)

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search