पिलीवचा किल्ला (Piliv fort)

पिलीवचा किल्ला (Piliv fort) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आहे. किल्ल्याचा एकंदरीत आकार पाहाता ही गढी असावी. किल्ला सुस्थितीत असून आतमध्ये वस्ती आहे.

उंची : १०० फूट ⛰️

इतिहास 🚩

● या किल्ल्याचे बांधकाम अठराव्या शतकात झाले आहे असे सांगितले जाते.
● किल्ल्यात सध्या रणजीतसिंह जहागीरदार राहतात. यांच्याच पूर्वजांनी हा किल्ला बांधला आहे.
● स्वराज्यातील सातारा कोल्हापूर भागातील किल्ल्यांवर किंवा शहरांवर, मोघल सैन्याचे विजापूर-सोलापूर या मार्गे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा.

स्थळदर्शन 😍

◆ किल्ल्याच्या चारही टोकाला भव्य बुरुज आहेत.
◆ किल्ल्याच्या आत एकूण १० बुरुज आहेत.
◆ किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्‍यांसाठी असणार्‍या देवड्या आहेत.
◆ प्रवेशद्वारासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे.
◆ किल्ल्यावर एक लहान तोफाही आहे.

गडाचा दरवाजा
हाताने चालवता येणारी तोफ

विशेष 🤩

★ हा किल्ला (Piliv fort) भुईकोट किल्ला असून तो अजूनही सुस्तीतीत आहे.

कसे जाल ? 🚶‍♂️

सातारा – पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून १०६ किमी व पंढरपूर पासून ४० किमी वर पिलीव गाव आहे. तर दहिवडी पासून पिलीव ४८ किमी वर आहे.

  • राहाण्याची सोय : पिलीव गावात राहण्याची सोया होऊ शकते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : स्वतःचे पाणी घेऊन आल्यास उत्तम.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search