घनगड (Ghangad)

घनगड (Ghangad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मुळशीच्या पश्चिमेला असलेल्या मावळ भागाला कोरसबारस मावळ म्हणतात. याच मावळात असलेला हा घनगड किल्ला.

उंची : ३००० फूट ⛰

इतिहास 🚩

● घनगड(Ghangad) किल्ल्या बाबतीत इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही.
● हा किल्ला आधी कोळी सामंतांकडे होता.
● पुढे तो निजामशाहीत आणि आदिलशाहीत गेला.
● पुढे मराठ्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले.
● पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी कोरीगड जिंकला आणि हा किल्ला सुद्धा घेतला.

स्थळदर्शन 😍

◆ गडावर(Ghangad) जाताना वाटेत एक पूरातन शंकर मंदिराचे अवशेष आहेत. त्याबरोबर शिवपिंड, नंदी ,वीरगळ व काही तोफगोळे येथे पहायला मिळतात.
◆ पुढे थोड्या अंतरावर गारजाई देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत.
◆ (Ghangad)किल्ल्यावर एक दरवाजा आहे ज्याची स्तिथी आता फारशी ठीक नाही.

◆ प्रवेशव्दारासमोर कातळात कोरलेली गुहा आहे. यात ४-५ जणांना रहाता येईल.
◆ किल्ल्यावर घरांचे पदके अवशेष आहेत.
◆ गडावर २ पाण्याच्या टाक्याही आहेत.

गडावरून दिसणारे इतर किल्ले – सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात.

विशेष 🤩

★ किल्ल्यावर “शिवाजी ट्रेल” या संस्थेने अवघड ठिकाणी शिडी व लोखंडाच्या तारा बसवलेल्या आहेत. तसेच किल्ल्याची डागडुजी करून माहीती फलक लावलेले आहेत..

जवळचे किल्ले

  1. सरसगड
  2. सुधागड
  3. कोरीगड
  4. कुर्डूगड

कसे जाल ? 🕺🏼

एकोले गावात जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डेकडे जाणारी एस. टी पकडावी. लोणावळा ते भांबुर्डे हे अंतर ३२ कि.मी चे आहे. भांबुर्डे गावातून चालत १५ मिनिटात एकोले गावात पोहोचता येते. एकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातील हनुमान मंदिराच्या विरुध्द बाजूस (रस्त्याच्या डाव्या बाजूला) गडावर जाणारी पायवाट आहे. ही वाट थेट किल्ल्यावर जात

  • राहाण्याची सोय : किल्ल्यावर गुहेत ४-५ जणांची, गारजाई मंदिरात १० लोकांची राहण्याची सोय होते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी शिडी जवळील टाक्यात आहे.

1 Comment

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search