अंकाई (Ankai)

अंकाई(Ankai) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. अंकाई आणि टंकाई हे दोन जोड किल्ले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्‍या सुरत – औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने हे किल्ले बांधण्यात आले.

उंची : ३१७० फूट ⛰

इतिहास 🚩

● अंकाई(Ankai) डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता.
● या किल्ल्याची निर्मिती यादवांच्या काळात झाली असं मानलं जात.
● तेराव्या शतकाच्या शेवटी अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी वर स्वारी केली व ह्यावेळीच अंकाई किल्ल्याची नासधूस केली.
● पुढे हा(Ankai) किल्ला अहमदनगरच्या सत्तेत गेला.

● इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला.
● पुढे १६६५ मध्ये हा किल्ला निजामाकडे गेला.
● पुढे इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा(Ankai) किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.
● इंग्रजांनी इतर किल्ल्याप्रमाणे १८१८ मध्ये हाही किल्ला जिंकून घेतला.

स्थळदर्शन 😍

◆ अंकाई(Ankai) किल्ल्याच्या रस्त्याला वाटेत एक गणेश मूर्ती आहे व तिथे काही वीरगळी आहेत.
◆ तिथेच एका शाळेच्या बाजूला ४ फूट उंचीची वीरगळ ठेवलेली आहे.
◆ किल्ल्याच्या पायथ्याला जैन लेणी आहेत. ती दोन टप्प्यात आहेत.
◆ पहिल्या टप्प्यात दोन लेणी आहेत.
◆ दुसऱ्या टप्प्यात आपल्याला दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली पाच लेणी दिसतात.

◆ यातील पहिली दोन लेणी दोन मजली आहेत.
◆ त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत.
◆ पुढे गेल्यावर आपल्याला दोन्ही किल्ल्यांमधील खिंड पाहायला मिळते. ती तटबंदी बांधून सुरक्षित केली आहे.
◆ जवळुन एक वाट लेण्यांकडे जाते. इथे एक वैष्णव लेण आहे. लेण्याच्या आत गर्भगृह कोरलेल आहे.
◆ लेणी पाहुन पायर्‍यांच्या मार्गावर आल्यावर आपण किल्ल्याच्या दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.

◆ प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य अष्टकोनी बुरुज आहेत.
◆ या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर कातळात खोदलेल्या (८० अंशाच्या कोनात) पायर्‍यांनी आपल्याला उभा चढ चढावा लागतो.
◆ काही पायर्‍या चढुन गेल्यावर तिसरे प्रवेशव्दार येते. त्यापुढे चौथे प्रवेशव्दार येते.
◆ पुढे पाचवा आणि झीज झालेले दगड असलेला सहावा दरवाजा ओलांडल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.
◆ इथे डाव्या बाजूला आपल्याला एक इमारत दिसते.

◆ पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक सीता गुहा आहे आणि तिथूनच जवळ अगस्ती गुहा आहे.
◆ किल्ल्यावर कातळात कोरलेला “काशी तळे” नावाचा तलावही आहे.
◆ या तलावाच्या मध्य भागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे असं मानले जाते.
◆ इथून पुढे गेल्यावर आपल्याला अजून दोन तलाव दिसतात.
◆ पुढे एक मोठा वाडा आहे.

विशेष 🤩

★ या(Ankai) किल्ल्यावर अगस्ती ऋषींनी आपला आश्रम बांधला होता.

जवळचे किल्ले 😍

  1. टंकाई
  2. गोरखगड (मनमाड)
  3. कात्रा

कसे जाल ? 🕺🏼

मनमाड हे एक जंक्शन आहे. मनमाड औरंगाबाद रस्त्यावर मनमाड पासुन १० किमीवर अंकाई गाव आहे. गावातील शाळेजवळुन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते.

  • राहाण्याची सोय : (Ankai)किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : मनमाड औरंगाबाद हायवे वर जेवणाची सोय होते.
  • पाण्याची सोय : (Ankai)किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.

फोटोस आभार : सोमेश महाजन

Google Map 🌎

लोकेशन पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search