पद्मदुर्ग (Padmadurg)

पद्मदुर्ग (Padmadurg) ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, “पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.”.

उंची : 500 फूट ⛰

इतिहास 🚩

● सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर हा किल्ला बांधला.
● येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांनी धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरोपंतांना साह्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते; पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली.
● संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत पद्मदुर्ग (Padmadurg) स्वराज्यात होता.
● संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे.
● त्यानंतर पद्मदुर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ पद्मदुर्ग (Padmadurg) किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट.
◆ पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात.
◆ दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत.
◆ मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.
◆ पडकोटामध्ये चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष आहेत.
◆ तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात.
◆ समोर मुरुडचा समुद्रकिनारा तर किनाऱ्यामागे डोंगरावर सिद्दीचा राजवाडा आहे.

पद्मदुर्ग (padmadurg)
मुख्य दरवाजा

विशेष 😍

★ ३५० वर्षे लोटली तरी दोन दगडांमध्ये वापरलेला चुना तसाच समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत जसाच्या तसा आहे परंतु दगडांची झीज झाली आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी. एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य माणसाला चकित करते. 
★ समुद्रात असलेल्या या किल्ल्यावरसुद्धा गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.

कसे जाल ? 🕺🏼

मुरूडला जाण्यासाठी अलिबाग-रेवदंडा-मुरूड हा एक गाडी मार्ग आहे.
मुरूड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनाऱ्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्यांकडे चौकशी केल्यास त्‍यांतील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेऊन जाऊ शकते.

  • राहाण्याची सोय :गडावर रहाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.
  • पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search