शिवनेरी (Shivneri)

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी (Shivneri) किल्ला. हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जुन्नर शहरात आहेत. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

उंची : ३५०० फूट ⛰

इतिहास 🚩

● ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे.
● यानंतर सातवाहनांची सत्ता इथे स्थापन झाली.
● सातवाहनांनंतर शिवनेरी (Shivneri) चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता.
● इ.स. १२०० नंतर यादवांचे राज्य स्थापन झाले याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.
● नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला.

● १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली.
● यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला.
● जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर (Shivneri) नेले.
● इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजी महाराजांसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. यानंतर मराठ्यांनी किल्ला घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले.
● १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

स्थळदर्शन😍

◆ या गडावर एकूण ७ दरवाजे आहेत.
◆ गडावर शिवाई देवीचे मंदिर आहे.
◆ या मंदिराच्या मागे ६-७ बुद्धकालीन गुहा आहेत.
◆ गडावर एक अंबारखाना आहे.
◆ अंबरखान्याचा पुढे महादेव कोळी यांच्या सैन्याचा जिथे शिरच्छेद करण्यात आला तो कोळी चौथरा आहे.
◆ या गडावर पाण्याच्या सोयीसाठी केलेली बरीच टाकी आहेत. यातील बदामी टाकी हि सर्वात मोठी टाकी आहे.

◆ जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा; मध्ये बसविला आहे.
◆ शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाके आहे.
◆ येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.
◆ येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलॊत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे.
◆ गडाच्या एक्दम शेवटचं टोक म्हणजे कडेलोट बुरुज.

विशेष 🤩

★ शिवनेरी (Shivneri) या किल्ल्यावर स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे.

★ १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

जवळचे किल्ले 😍

  1. नारायणगड
  2. हडसर
  3. निमगिरी
  4. चांवड
कसे जाल ? 🕺🏼

मुंबईहून माळशेज घाट पार केल्यानंतर जुन्नरला जावं. जुन्नर बसस्टॅन्ड वरून २ किमी अंतरावर शिवनेरी (Shivneri) किल्ला आहे.

  • राहाण्याची सोय : या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणार्‍या वर्‍हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते.
  • जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वत:च करावी.
  • पाण्याची सोय : गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search