दुर्गाडी (Durgadi)
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात कल्याणमध्ये दुर्गाडी (Durgadi) किल्ला आहे. कल्याण हे शहर खूप जुने असून हा एक भुईकोट किल्ला होता ज्याला ११ बुरुज आणि अनेक दरवाजे होते. कल्याणच्या ह्या भूइकोटा शेजारी खाडीवर शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला बांधला व मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
उंची : ० फूट
इतिहास 🚩
● इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात.
● सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते.
● मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते.
● कल्याण शहर हे बहामनी सत्तेतही होते.
● १५७० च्या आसपास पोर्तुगीजांनी कल्याण जाळल्याचा उल्लेख इतिहासात आहे.
● पुढे हा प्रदेश निजामशाहीत होता.
● निजामशाहीच्या अस्तानंतर कल्याण परिसर आदिलशहाच्या त्याब्यात गेला.
● २४ ऑक्टोबर १६५४ रोजी शिवरायांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला.
● कल्याण जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी कल्याण कोटाच्या कडेला उल्हास नदीच्या शेजारी किल्ला बांधायला सांगितला.
● आबाजी महादेव यांनी किल्ल्याचे बांधकाम करायला सुरवात केली.
● त्यांना बांधकाम करताना काही संपत्ती सापडली, ती दुर्गेच्या कृपेने मिळाली असे मानून या किल्ल्याला दुर्गाडी (Durgadi) असे नाव देण्यात आले.
● किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली.
● पुढे १६८२ साली मोगल सरदार हसनअली खानने कल्याण जिंकले.
● परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी ते परत जिंकून घेतले.
● संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोघलांनी दुर्गाडी परत जिंकून घेतला.
स्थळदर्शन 😍
◆ किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे.
◆ या मार्गावरून आत गेल्यावर एक दरवाजा होता जो आता नष्ट झालेला आहे. त्याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जात.
◆ दरवाजासमोरच गणेशाची मूर्ती आहे.
◆ दरवाजाच्या बाजूला आता बुरुज बांधलेले आहेत.
◆ या मूर्तीच्या मागे देवीचे मंदिर आहे.
◆ मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे.
◆ गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत.
विशेष 🤩
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची सुरवात याच किल्ल्यापासून केली.
कसे जाल ? 🚶🏻♂
कल्याण स्थानकावरून गाडीने आपण १०-१५ मिनिटात किल्ल्याजवळ पोहचू शकतो.
- राहाण्याची सोय : कल्याणमध्ये राहण्याची व्यवस्था होते.
- जेवणाची सोय : गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.
- पाण्याची सोय : गडावर जाताना पिण्याचे पाणी सोबत घेऊन जावे.