साल्हेर (Salher)

साल्हेर (Salher) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा (Salher) किल्ला येतो.

उंची : ५१४० फूट ⛰️

इतिहास 🚩

साल्हेर (Salher) किल्ल्याला प्राचीन काळापासून महत्व आहे.
● गडावर सन १३४०च्या दरम्यान बागलाणचा राजा मानदेव याचे राज्य होते.
● शहाजादा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना बागलाणचा राज बहिर्जीने मोगलांना घाबरून न लढताच साल्हेर, मुल्हेर देऊन टाकले.
● औरंगजेबाने साल्हेरचे नाव बदलून सुलतानगड ठेवले.
● छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.

● ही बातमी कळताच औरंगजेबाने बहादुरखान व दिलेरखान तसेच सोबत इखलासखान मियाना चंद्रावत व रायमकरंद इत्यादी वीरांना साल्हेर (Salher) जिंकून घेण्यास पाठवले.
● मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले, ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे, आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे. असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे. ’ अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.

● सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो.

‘‘चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की , तीन कोश औरस चौरस ,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले. पूर वहिले रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले ,असा कर्दम जाहला मराठ्यांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोडे, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना ,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली.

सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे. भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत ,मोरोपंत पेशवे, आनंदराव ,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभाव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो पातशहा असे कष्टी जाले ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते. आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे, आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही’ असे बोलिले.

● ४ जानेवारी १६७० मराठ्यांनी त्यांच्यावर मोठा विजय प्राप्त केला.
● पुढे सन १७६० मध्ये मोगलांच्या ताब्यातून हा (Salher) गड पेशवाईत मराठय़ांच्या ताब्यात आला.

● अखेर सन १८१८मध्ये इतर गडांप्रमाणे हा (Salher) गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ गडाच्या पश्चिमेला माची आहे त्याला मुख्य दरवाजा आहे.
◆ माचीला पूर्णपणे बंदिस्त तटबंदी आहे.
◆ पुढे गडावर पोहोचण्यासाठी ४ दरवाजे ओलांडावे लागतात.
◆ माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे.
◆ टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
◆ गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा गंगासागर तलाव आहे.

salher

◆ गंगासागर तलावा शेजारी गंगा -यमुना टाके आहे.
◆ गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकलिका देवीचे सुंदर मंदिर आहे .
◆ तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे.
◆ गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे.
◆ तसेच माथ्यावरचे मंदिर रेणुका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे.

◆ गडावरून दिसणारे इतर किल्ले – अचला, अहिवंत मार्कींडय़ा, रावळा-जवळा, धोडप, कांचन, राजदेहेर , चौल्हेर, भिलाई, मुल्हेर, मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात

विशेष 🤩

★ साल्हेर (Salher) किल्ल्याची लढाई मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाची आणि मोठी लढाई मनाली जाते.
★ साल्हेर (Salher) किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे.

जवळचे किल्ले 🤩

  1. सालोटा
  2. कोठ्या
  3. सोनाऱ्या
  4. धामण्या
  5. टकर
  6. हरगड
  7. मोरागड
  8. मुल्हेर
कसे जाल ? 🚶🏻‍♂️

साल्हेरचा किल्ला सटाण्याच्या पश्चिमेला आहे.

  1. वाघांबे मार्गे : साल्हेरला जाण्यासाठी नाशिक – सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. या वाटेने गडावर जातांना चार दरवाजे लागतात. तिसर्‍या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कड्यात खोदलेल्या १८ ते २०गुहा आहेत. चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो.
  2. माळदर मार्गे : गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते.सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते.
  3. साल्हेरवाडी मार्गे : साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा – ताहराबाद – मुल्हेर – साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही.
  • राहाण्याची सोय : गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची सोय व्यवस्थित होऊ शकते.
  • जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
  • पाण्याची सोय : गंगासागर तलाव व त्याच्या बाजूस असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे.

Google Map 👇🌎

साल्हेर किल्ला 🚩

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search