हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

हरिश्चंद्रगड (Harishchandragad) हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पाश्वर्भूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन-चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगडाला (Harishchandragad)’ट्रेकर्सची पंढरी’ असंही म्हटले जाते.

इतिहास 🚩

हरिश्चंद्रगडाचा (Harishchandragad) उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.
● साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने येथे मंदिर बांधल्याचा संधर्भ आढळतो.

● आदिवासी कोळी महादेव समाजाकडे हा किल्ला होता.
● आदिवासी कोळी महादेव समाजाला हरवून मुघलांनी हा (Harishchandragad) किल्ला जिंकून घेतला.
● १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला.

पाहण्यासारखे 😍

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणत… सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ’मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे.

केदारेश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्य…स्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे.

तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची … उंची साधारणत: ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे.याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते.

गणेश गुहा
साहेबांची गुहा
सिद्धेश्वर गुहा

कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, रौद्रभीषण कोकणकडा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारण ४५०० फूट एवढी आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे “इंद्रव्रज” दिसल्याची नोंद आहे. इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय.

बालेकिल्ला : खिरेश्वर वाटेने आल्यावर टोलारखिंडीतून वर आल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे.

पुष्करणी : हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराबाहेरच सप्ततीर्थ पुष्करणी आहे. पुष्करणीच्या एका भिंतीत छोट्या देवळ्या आहेत, ज्यात आधी देवांच्या मूर्ती होत्या परंतु आता त्या मंदिरात ठेवल्या आहेत.

गडावरून दिसणारे गडकिल्ले : शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड , कळसुबाई.

विशेष 🤩

★ हरिश्चंद्रगड (Harishchandragad) हा किल्ला नगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.

जवळचे किल्ले 🤩

  1. कलागड
  2. सिंदोळा
  3. भैरवगड
  4. निमगिरी

कसे जाल ? 🕺🏼

किल्ल्यावर जाण्यासाठी चार रस्ते आहेत.

१) खिरेश्वर गावातून : सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर, ५ कि.मी अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेली आहे. आतील गाभार्‍याच्या दाराच्या चौकटीवर शेषशायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन गणेशगणेशानी ,वृषभवाहक शीवपार्वती , हंसवाहन ब्रह्म सरस्वती, मयूरवाहन स्कंदषष्टी, नरवाहन कुबेरकुबेरी, मकरवाहन मकररति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला ’नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात.

अ) एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात हरीश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहचते. टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते.
ब) दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेणे आवश्यक आहे, कारण वाटेत कुठेच पाणी मिळत नाही.

२) नगर जिल्ह्यातून ( पाचनई मार्गे) : हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई – नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर – पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किमी आहे.

३) सावर्णे – बेलपाडा – साधले असा घाटमार्ग : गड सर करण्यासाठी सावर्णे – बेलपाडा – साधले असा घाटमार्ग आहे. मुंबई – माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव आहे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ – ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्‍या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई – माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) जाता येते.

परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. येथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे १० ते १२ तास लागतात.

४) नळीची वाट : हरिश्चंद्रगडावर (Harishchandragad) जाण्याची सर्वात कठीण वाट म्हणजे नळीची वाट आहे. नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून हरिश्चंद्रगड व बाजूच्या डोंगराच्या मधल्या अरूंद घळीतून कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. बेलपाडा गावात जाण्यासाठी, मुंबई – माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ – ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्‍या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई – माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात.

बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन ओढा पार करावा लागतो. चार वेळा ओढा पार केल्यावर वाट कोकणकडा व बाजूचा डोंगर यांच्या मधल्या अरूंद घळीतून वर चढत जाते.ही वाट फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गाने कोकणकड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे ८ ते १२ तास लागतात.

  • राहाण्याची सोय : गडावरील (Harishchandragad) गुहांमध्ये ५० ते ६० जणांची राहाण्याची सोय होते. तसेच पैसे दिल्यास राहाण्यासाठी तंबू आणि इतर सुविधा उपलब्ध होतात.
  • जेवणाची सोय : गडावर (Harishchandragad) जेवणाची सोय उपलब्ध आहे.
  • पाण्याची सोय : गडावर (Harishchandragad) विपुल प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search