चंदेरी ( Chanderi )
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असणाऱ्या माथेरान डोंगररांगेत नाखिंड, चंदेरी (Chanderi), म्हैसमाळ, नवरा , नवरी, बोयी, पेब , माथेरान, ताहुली आणि सोंडाई ही सारी शिखरे आहेत. या डोंगररांगेत आपला भलाथोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका म्हणजेच चंदेरी (Chanderi) किल्ला. बदलापूर – वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर – कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीला जायची वाट आहे. चंदेरीच्या (Chanderi) पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे.
उंची : २३०० फूट ⛰️
इतिहास 🚩
● या किल्ल्याच्या इतिहासात नोंदी आढळत नाहीत.
● किल्ल्यावरील अवशेष पाहता हा किल्ला एक लष्करी चौकी असावी असेच वाटते.
● छत्रपती शिवाजी महाराजांनी मे १६५६ मध्ये कल्याण, भिवंडी हा परिसर जिंकून घेतला त्यावेळी हा किल्ला जिंकला असावा.
स्थळदर्शन 😍
◆ किल्ल्याच्या अर्ध्यावर एक गुहा आहे.
◆ गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता.
◆ शिवपिंडी भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे.
◆ गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे.
◆ गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे.
◆ कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे.
◆ सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब, प्रबळची डोंगररांग इ दिसते.
◆ तर मावळतीला भीमाशंकरचे पठार ,सिध्दगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ दिसतात.
जवळचे किल्ले 🤩
- मलंगगड
- विकटगड (पेब)
- प्रबळगड
- सोंडाई
कसे जाल? 🚶
मुंबई – कर्जत लोहमार्गावरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणार्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट चिंचोली या पायथ्याच्या गावी घेऊन जाते. इथून पुढे आपल्याला चंदेरीला (Chanderi) जात येते.
- राहाण्याची सोय : गडावरील गुहेत ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते.
- जेवणाची सोय : गडावर जेवणाची व्यवस्था नाही., आपण स्वत: करावी.
- पाण्याची सोय : ऑक्टोबरच्या शेवट पर्यंत (पावसावर अवलंबून आहे) टाक्यात पाणी असते.