फत्तेगड (Fattegad)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे फत्तेगड(Fattegad). रत्नागिरीतील सुवर्णगडाच्या संरक्षणासाठी हर्णे गावाच्या समुद्रकिनार्यावर गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड हे तीन उपदुर्ग बांधण्यात आले होते. त्यापैकी गोवा किल्ला व कनकदुर्ग यांचे काही अवशेष आजही अस्तित्वात आहेत. परंतु फत्तेगडाची समुद्राकडील भिंत व कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या मधील दगडी पुल सोडून कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.
उंची : ० फूट
इतिहास 🚩
● फत्तेगडाची(Fattegad) उभारणी खर्यातखान याने केली व त्याची निर्मिती शिवकालानंतरची असावी असे मानतात.
● कान्होजी आंग्रे – मानाजी आंग्रे यांनंतर सुवर्णगड ,गोवा किल्ला, कनकदुर्ग आणि फत्तेगड या किल्ल्यांचा ताबा तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला.
● पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर , पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द मोहीम उघडली. त्यावेळी कमांडर जेम्स याने हे किल्ले जिंकून पेशव्यांच्या हवाली केले.
● इ.स. १८१७ मध्ये इंग्रजांनी हे किल्ले पेशव्यांकडून जिंकून घेतले.
स्थळदर्शन 😍
◆ फत्तेगडाची समुद्राकडील भिंत(तटबंदी) यासोबतच कनकदुर्ग आणि फत्तेगड(Fattegad) यांच्या मधील दगडी पुल हे अवशेष या किल्ल्यावर आहेत.
जवळचे किल्ले 😍
- सुवर्णगड
- कनकदुर्ग
- गोवा किल्ला
कसे जाल ? 🚶🏼
मुंबईहून दापोली मार्गे मुरुड हर्णेला जाता येते. हर्णेच्या समुद्रकिनार्यावर उंचवट्यावर कोळी लोकांची वस्ती दिसते, ही वस्ती फत्तेदुर्ग मध्येच वसलेली आहे.
- राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
- जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
- पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.