कैलासगड (Kailasgad)

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असणारा एक गिरिदुर्ग किल्ला म्हणजेच कैलासगड(Kailasgad). ताम्हणी मार्गे कोकणात उतरणार्‍या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या कैलासगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. कैलासगड हा मुळशी धरणाच्या परिसरात वसलेला अपरिचित किल्ला आहे.

उंची : ३३०० फूट

इतिहास 🚩

● कैलासगड(Kailasgad) किल्ल्यावरील टाक्यावरून हा किल्ला सातवहान काळात बांधला असावा असे वाटते.
● ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवीसन १७०६ मध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या पत्रात मिळतो.
● याव्यतिरिक्त या (Kailasgad) किल्ल्याचा अधिक इतिहास उपलब्ध नाही.

स्थळदर्शन 😍

◆ लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर , तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने एक किलोमीटरवर एक खिंड आहे.
◆ या खिंडीत डाव्या बाजूला म्हणजेच धरणाच्या बाजूला एक ट्रान्सफ़ॉर्मर आहे. तर उजव्या बाजूला कैलासगड असलेल्या डोंगराची धार खाली उतरलेली आहे.
◆ या ठिकाणी किल्ले कैलासगड(Kailasgad) उर्फ़ घोडमांजरीचा डोंगर अशी पाटी लावलेली आहे.
◆ या टेकडीवर जाणार्‍या मळलेल्या पायवटेने आपण १५ मिनिटात टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो.
◆ येथून मुळशी धरणाच्या पाण्याचा फ़ुगवटा व्यवस्थित दिसतो.

◆ पुढे असलेली दुसरी टेकडी थेट किल्ल्याच्या डोंगराला भिडलेली आहे. ही टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो.
◆ टेकडी जिथे संपते तिथे किल्ल्याच्या डोंगराचा सरळसोट कडा खाली उतरलेला आहे.
◆ त्यामुळे किल्ल्याचा डोंगराला वळसा घालून डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो.
◆ येथे उजव्या बाजूला पठार आहे. त्यावर एक भगवा झेंडा लावलेला आहे.
◆ या पठारावरून दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.

◆ पठाराच्या विरुध्द बाजूला एक छोट टेकाड आहे.
◆ त्यावर चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक खाली उतरणारी पायवाट दिसते. या अवधड वाटेने ५ मिनिटे उतरल्यावर आपण कातळात खोदलेल्या गुहा टाक्यापाशी पोहोचतो.
◆ या टाक्यात खांब खोदण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. पण दगड ठिसूळ लागल्याने काम अर्धवट सोडले असावे.
◆ टाक पाहून परत पठारावर येऊन डावीकडच्या टेकाडावर चढून गेल्यावर उध्वस्त घरांचे काही चौथरे पाहायला मिळतात.
◆ पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जातांना डाव्या बाजूला एक दगडांची भिंत घातलेली दिसते.

Kailasgad

◆ त्याच्या आत कातळावर कोरलेल शिवलिंग आहे.
◆ इथे आपली गड प्रदक्षिणा संपते.
◆ येथे आपल्याकडे दोन पर्याय असतात. आल्या मार्गाने खिंडीत उतरायच किंवा शिवलींगाच्या पुढे असलेल्या टोकावरून उतरणार्‍या पायवाटेने खालच्या रस्त्यावर भादसकोंडा गावाच्या दिशेला उतरायच.

◆ भादसकोंडा गावाच्या पायवाटेने खाली उतरल्यावर वडुस्ते – ताम्हणी रस्त्याच्या कडेला वाघदेवाचे मंदीर आहे. तेथुन वर चढुन गेल्यावर एक नैसर्गिक गुहा आहे. ती पाहून डांबरी रस्त्याने आपण १० मिनिटात खिंडीपाशी पोहोचतो.

जवळचे किल्ले 😍

  1. घनगड
  2. सुधागड
  3. कोरीगड
  4. मोरगिरी

कसे जाल ? 🚶🏼

  • पुणे-मुळाशी-ताम्हणी मार्गे कैलासगड(Kailasgad) ७८ किलोमीटरवर आहे. पुणे मार्गे येतांना भादसकोंडा गावाच्या पुढे कैलास गडाची खिंड आहे.
  • मुंबई मार्गे येताना लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भुशी डॅम, INS शिवाजीला जाणार्‍या रस्त्याने पेठ शहापूर – बा – मार्गे वडुस्ते हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे.लोणावळ्याहून वडुस्ते गावात पोहोचल्यावर , तोच रस्ता पुढे ताम्हणी घाट आणि मुळशी मार्गे पुण्याकडे जातो. या रस्त्याने दोन किलोमीटरवर एक खिंड आहे. या खिंडीतून आपल्याला या (Kailasgad) किल्ल्याकडे जात येते.
  • राहाण्याची सोय : किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : किल्ल्यावरील पाणी पिण्यायोग्य नाही.
  • पाण्याची सोय : किल्ल्याच्या परिसरात जेवणाची सोय नाही.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search