वर्धनगड (Vardhangad)

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात वर्धनगड (vardhangad) हा किल्ला आहे. सातारा पंढरपूर मार्गावर सातारा जिल्ह्यापासून ५५ ते ६० किमी अंतरावर वर्धनगड किल्ला आहे.

उंची : १५०० फूट

इतिहास 🚩

● अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड (vardhangad) बांधून घेतला.
● १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते.
● १३ जून १७०१ रोजी मोगली सरदार फतेउल्लाखान याने किल्ल्यावर हल्ला केला.
● १९ जून १७०१ रोजी रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला.
● हा किल्ला जिंकून औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलले व ‘सादिकगड’ असे ठेवले.
● सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला.
● ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.
● १७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला.
● १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे वर्धनगडही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ गडाला पूर्वाभिमुख गोमुखी प्रवेशद्वार असून, ते सुस्तिथित आहे.
◆ दरवाज्यातून आत गेल्यावर एक ध्वजस्तंभ आहे.
◆ दरवाजाला लागूनच किल्ल्याची तटबंदी आहे.
◆ किल्ल्याची तटबंदी संपूर्ण किल्ल्याला वळसा घालून दरवाजाजवळ येऊन संपते.
◆ दरवाजातून आत गेल्यावर एक टेकडी आहे.
◆ टेकडीवर जाताना वाटेत एक पाण्याचे टाके दिसते.
◆ वाटेतच भग्न अवस्थेत असलेली हनुमानाची मूर्ती आहे.
◆ पुढे शंकराचे छोटेसे मंदिरही आहे.
◆ टेकाडावर गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर आहे.
◆ मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे.
◆ मंदिराच्या मागच्या बाजूला बरीच पाण्याची टाकी आहेत.

मुख्य दरवाजा

विशेष 🤩

★ गडावर काही काळ छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते.

कसे जाल ? 🕺🏼

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा आणि फलटण या दोन्ही बाजूंनी रस्ते आहेत.
१) सातारा – पंढरपूर रस्त्यावर सातार्‍या पासून ३० किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
२) फलटण – मोळघाट – पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४१ किमी वर आहे. पुसेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत.

वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो.

  • राहाण्याची सोय : किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
  • जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

2 Comments

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search