सुभानमंगळ (Subhanmangal)
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असलेला स्वराज्याच्या पहिल्यावहिल्या विजयाचा साक्षीदार सुभानमंगळ (Subhanmangal) किल्ला. या किल्ल्याची अवस्था खूप वाईट आहे.
उंची : ० फूट
इतिहास ⛳
● हैद्राबादच्या निजामाने हा किल्ला बांधून घेतला होता.
● छत्रपती शिवाजी महाराजांनी हा (Subhanmangal) किल्ला १६४८ साली जिंकला.
● पुढे फत्तेखानाने शिरवळ जवळ तळ ठोकला आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले.
● महाराजांनी युद्ध न करताच किल्ला त्यांच्या स्वाधीन केला.
● दुसर्या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ (Subhanmangal) घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, भिकाजी चोर, भैरोजी चोर , बाजी पासलकर हे सरदार होते.
पाहण्यासारखे 😍
◆ किल्ल्याची निशाणी असलेला एकमेव बुरुज आज शिल्लक आहे.
◆ बुरुजाजवळ दुर्गा देवीचे मंदिर आहे .
◆ दुर्गा देवीच्या मंदिरात प्रवेश करण्या अगोदर डाव्या हाताला दोन वीरगळी पाहायला मिळतात.
विशेष 🤩
★ स्वराज्याची पहिली लढाई अनुभवलेला हा (Subhanmangal) किल्ला आहे.
कसे जाल? 🏃🏼
पुण्याहून स्वारगेट एस. टी. स्थानकातून कराड- साताराला जाणार्या एस. टी. ने शिरवळला पोहचता येते. बसने शिरवळ बस स्थानकात उतरून पुण्याच्या दिशेने १ किलोमीटर चालत गेल्यास डाव्या बाजूला केदारेश्वर मंदिर आणि उजव्या बाजूला शिरवळचा राजा मंदिर पाहून ब्राह्मण गल्लीतून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. वाट गावाच्या मध्य भागातून आणि बाजारपेठेतून जाते.
- राहाण्याची सोय : राहण्याची सोय शिरवळ मधील हॉटेल मध्ये होऊ शकते.
- जेवणाची सोय : जेवण्याची सोय आपण स्वतः करावी.
- पाण्याची सोय : पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.
ॲडव्होकेट इम्तियाज दिलावर खान (नाईकवाडी)
2 years agoत्याच काळात सुभानमंगळ किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तर बाजूला शाही मस्जिद नावाने मशिद बांधलेली होती,ती आजही अस्तित्वात आहे, नूतनीकरण करण्यात येवून सध्या नमाजपठण सुरू असते.वीर धरण झाल्याने बॅकवॉटरच्या पाण्यात किल्ल्याचा ८० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे…
ॲडव्होकेट इम्तियाज दिलावर खान (नाईकवाडी)
किल्ल्याचे तत्कालीन रखवालदार यांचे वारस.