आंबोळगड (Ambolgad)

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड (Ambolgad) व यशवंतगड. “मुसाकाजी” या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला.

उंची : ८२ फूट

इतिहास 🚩

● या (Ambolgad) किल्ल्याबद्दल अधिक इतिहास उपलब्ध नाही.
● इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला.
● इ.स. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठवली गेली.

स्थळदर्शन 😍

◆ हा (Ambolgad) किल्ला आंबोळ्गड गावात समुद्रा शेजारील वसवलेला एक किल्ला आहे.
◆ किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे.
◆ सध्या खंदक बुजलेला आहे.
◆ सध्याच्या घडीला किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे.
◆ चिरे एकमेकांवर रचून बनवलेली तटबंदी १० ते १५ फ़ुट उंचीची होती.

◆ आता ती ढासळल्याने ६ ते ७ फ़ुट उंचीची तटबंदी पाहाता येते.
◆ उध्वस्त प्रवेशव्दारातून गडात प्रचेश करतांना उजव्या बाजूला एक बुरुज दिसतो.
◆ प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भिंत आहे .
◆ त्यापुढे बुरुज होता आता तो पूर्ण ढासळलेला आहे.
◆ किल्ल्याच्या प्रवेशव्दारावर थेट मारा करता येऊ नये म्हणून अशी रचना केलेली होती.

◆ किल्ल्यात शिरल्यावर मध्यभागी एक वडाचे मोठे झाड आहे. त्याने पूर्ण किल्ल्यावर सावली धरलेली आहे.
◆ या झाडा समोर एक तुटलेली तोफ़ पडलेली आहे.
◆ झाडामागे आत्यताकृती विहिर आहे. विहीरीच्या समोर आणि बाजूला दगडी पात्र आहेत.
◆ विहिरीच्या उजव्या बाजूला उध्वस्त वास्तूचे जोते आहे. त्या समोर समाधीचे वृंदावन आहे.
◆ याशिवाय किल्ल्यावर काही घरांची जोती पाहायला मिळतात.
◆ किल्ल्या पासून पुढे जाणार्‍या रस्त्याने सड्यावर गेल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या सड्यावरुन सागराचे दर्शन होते.

जवळचे किल्ले 😍

  1. यशवंतगड

कसे जाल ? 🚶🏼

रत्नागिरीहून पावस – आडीवरे – नाटे -आंबोळगड(Ambolgad) यामार्गे अथवा राजापूर- नाटे- आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते. रत्नागिरीहून आंबोळगडासाठी बस उपलब्ध आहेत.

  • राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही, गावातील ऋषी पर्यटनात राहाण्याची सोय होऊ शकते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. नाटे येथे जेवणाची सोय होते.
  • पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search