नरनाळा (Narnala)

महाराष्ट्रात असलेल्या अकोला जिल्ह्यातील तब्बल २४ किमी लांबीची तटबंदी असलेला नरनाळा (Narnala) किल्ला. नरनाळा किल्ला अतिशय दुर्गम असा गिरिदुर्ग आहे. अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे.

उंची : ३१६१ फूट
इतिहास 🚩

● या किल्ल्याची दुरुस्ती इ.स.१४२५ मध्ये बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने केल्याचा उल्लेख आहे .
● पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आला .
● १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना झाली व हा किल्ला त्यांच्या ताब्यात आला.
● १५७२ मध्ये नरनाळा निजामशाहीत सामिल झाला.
● इ.स.१५९८ मध्ये अकबराने नरनाळा किल्ला मुघल साम्राज्याला जोडला.
● परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला.
● इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करुन नरनाळा ताब्यात घेतला.
● पण लवकरच किल्ला पुन्हा निजामाच्या ताब्यात गेला.
● भोसल्यांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
● १८०३ साली झालेल्या भोसले व इंग्रज यांच्यातील तहानुसार हा किल्ला भोसल्यांच्या ताब्यात आला.
● पुढे किल्ला परत इंग्रजांच्या हातात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ नरनाळा (Narnala) किल्ला ३३२ एकरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी अंदाजे २४ किमी आहे.
◆ शहानुर दरवाजा , मेहंदी दरवाजा आणि महाकाली दरवाजा
◆ महाकाली प्रवेशव्दारावर फारसीत कोरलेला चार ओळींचा शिलालेख आहे.
◆ गज बहादूर वली यांची घुमटाकृती कबर आहे.
◆ राणी महाल – ही इमारत १९ मीटर * ६ मीटर आकाराची असून, तीला तीन कमानी आहेत.
◆ शक्कर तलाव – या तलावाच्या काठावर बुर्‍हाणउद्दीन पीराचे थडगे आहे. थडग्यावर फार्सी शिलालेख कोरलेला आहे.
◆ अंबरखाना (तेल तुपाचे टाकं)
नऊगजी तोफ – ही तोफ १८ फूट लांब असून तीचा परीघ ६ फूट आहे.
◆ मोती तलाव (मोठा तलाव), दमयंती तलाव (सागर तलाव), राम तलाव (धोबी तलाव) असे बरेच तलाव आहेत.
◆ मशिद , घोड्याच्या पागा, गजशाळा अश्या अनेक वास्तू या गडावर आहेत.

१८६० मधील नरनाळा किल्ल्याचा एक जुना फोटो

विशेष 🤩

★ या किल्ल्याला तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग आहेत.

कसे जाल ? 🕺🏼

अकोल्या पासून नरनाळा (Narnala) किल्ला ६६ किमी वर आहे. अकोल्याहून ४० किमी वर अकोट हे तालुक्याचे गाव आहे. अकोटहून पोपटखेड मार्गे शहानुर हे नरनाळा किल्ल्याचे गाव २० किमी वर आहे. शहानुर गावाताच वनखात्याची चौकी आहे. तिथे पावती फाडून ६ किमी वरील नरनाळा गडावर वहानाने किंवा चालत जाता येते

  • राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, पण अकोला, अकोट किंवा शहानुर गावात निवासाची सोय आहे. शहानुर गावात वनखात्याची व खाजगी निवासाची सोय आहे, पण त्यासाठी आगाऊ आरक्षण करावे लागते.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, परंतू शहानुर गावात जेवणाची सोय आहे. किल्ला संपूर्ण पाहाण्यास अख्खा दिवस लागतो, त्यामुळे बरोबर खाण्याचे साहित्य बाळगावे
  • पाण्याची सोय : गडावरील तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे, पण पाण्याचा साठा सोबत असल्यास उत्तम.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search