भूषणगड

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात भूषणगड हा किल्ला आहे. किल्ला ज्या परिसरात आहे त्या परिसरात आजूबाजूला कोणताच डोंगर नाही त्यामुळे किल्ला लांबूनच नजरेस पडतो.

उंची : २९७० फूट
इतिहास 🚩

● तेराव्या शतकात देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दुसरा याने हा किल्ला बांधून घेतला.
● यादवांच्या पतनानंतर हा किल्ला बहामनी सत्तेत गेला.
● बहामनी सत्तेचे पाच तुकडे झाले तेव्हा हा किल्ला आदिलशाहीत आला.
● १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. व त्याची डागडुजी केलीं.
● मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून औरंगजेबाने त्याचे नाव इस्लामतारा असे केले.
● पुढे परत पेशव्यांनी हा गड जिंकून स्वराज्यात आणला.
● पुढे १८४८ मध्ये सातारा इंग्रजांकडे गेल्यामुळे किल्लाही इंग्रजांकडे गेला.

पाहण्यासारखे 😍

◆ किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे.
◆ वाटेच्या सुरवातीलाच एक सिमेंटची कमान आहे, त्या कमानीला एक घंटा बांधलेली आहे.
◆ गडाचा दरवाजा गोमुखी असून त्याची कमान पडलेली आहे परंतु दरवाजाचे बुरुज अजूनही आहेत.
◆ प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत.
◆ प्रवेशद्वारासमोरून वाट तटबंदीच्या बाजूने जाते.
◆ बाजूलाच एक खोल विहीर आहे.
◆ प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीबाजूने पायर्‍या चढलो की मोठ्या बुरुजाकडे जात येते.
◆ इथून पुढे वर गेल्यावर एक कुंड दिसते.
◆ कुंडाशेजारी महादेवाचे छोटे मंदिर आहे.
◆ इथून थोडं वर गेलं की हर्णै देवीचं मंदिर आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे.
◆ मंदिरासमोरील पायवाटेने उतरुन गेल्यावर आपण गडाच्या तटबंदीजवळ येतो. तटबंदी अजूनही सुस्तिथित आहे.
◆ येथेच सदरेची जागा सुद्धा आहे. तसा फलक तिथे लावलेला आहे.
◆ तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो.
◆ प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते.

विशेष 🤩

★ गडावर पिवळ्या फुलांची झाडे अधिक प्रमाणात आहेत शिवाय गावकऱ्यांनी वृक्षारोपणाची केले आहे. त्यामुळे गड हिरवीगार दिसतो.

कसे जाल ? 🕺🏼

साताऱ्यातून खटाव तालुक्यातील पुसेगाव इथे जावे, तिथून पुढे वडूज या गावी जावे इथून भूषणगड साठी बस मिळते.

  • राहाण्याची सोय : गडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था होऊ शकेल.
  • जेवणाची सोय : गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.
  • पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search